सुशील ओझा, झरी: तालुक्यातील जंगल परिसरात असलेल्या मागुर्ला शिवारात एका गर्भवती वाघिणीचे क्रूरतेनं शिकार करून ठार मारण्यात आले व तिला जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणी बाप लेकांना अटक करण्यात आली व त्यांच्या जवळून वाघिणीचा पंजा व नख जप्त करण्यात आले. या प्रकरणी मुकुटबनचे ठाणेदार धर्मा सोनुने, एएसआय ऋषी ठाकूर व दिलीप जाधव यांनी मोलाची भूमिका बजावली. या उत्कृष्ट कामगीरी बद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडून 50 हजाराचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे
मागुर्ला येथील वन क्र 30 मध्ये एक नाल्या जवेळील गुहेत 25 एप्रिल रोज एक वाघिणीची धारदार शास्त्राने वार करून तसेच गळ्यात फास आवरून निर्घृण हत्या केल्याचे उघड झाले. शिकाऱ्यांनी वाघिणीचे दोन पंजे तोडून नेले व वाघिणीला जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे संपूर्ण जिल्हा सह महाराष्ट्रत खळबळ माजली होती. मृत वाघिणी गर्भवती होती व तिच्या पोटात चार पिल्ले होते. वाघिणीसह पोटात असलेले चार पिलांचाही मृत्यू झाल्याने वनविभागासमोर मोठे आवाहन होते. वनविभागा मार्फत अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले व तपास सुरू केला परंतु आरोपीचा कोणताही उलगडा होत नसल्याने अखेर वनविभागाला पोलिसांची मदत घ्यावी लागली.
पोलिसांची मदत घेताच मुकुटबन पोलीस स्टेशनचे ठाणेदार धर्मा सोनुने यांनी कर्मचारी ए.एस. आय ऋषी ठाकूर व जमादार दिलीप जाधव यांना घेऊन दुसऱ्याच दिवशी सकाळी 7 वाजता घटनास्थळ गाठून पाहणी केली. कर्मचारी ठाकूर व जाधव यांना मार्गदर्शन केले व सांगितल्या प्रमाणे काम सुरू झाले. दिलीप जाधव यांची बिट असल्याने दुसऱ्याच दिवशी खाजगी व परिसरातील गुप्तहेर यांना पकडून नख कुणाजवळ आहे याची पक्की माहिती काढली व ठाणेदार सोनुने यांना सांगितली.
आरोपी पांढरवाणी येथील असल्याने व आरोपी अटक करण्याकरिता गेल्यास कर्मचारी यांच्यावर हमला होऊ शकतो, कायदा सुव्यवस्थेचा बिगडू शकते याचा संपूर्ण विचार करून आरोपीला अटक न करता ही माहिती वरीष्ठ अधिकारी यांना दिली. वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तिसऱ्या दिवशी 30 एप्रिलला ठाणेदार सोनुने व ए. एस. आय ऋषी ठाकूर आरोपीला अटक करण्याकरिता पांढरवानी गावात सकाळ पासूनच पोहचले व आरोपी गावात आहे किंवा नाही याची माहिती घेतली.
ठाणेदार यांना दूर ठेऊन ऋषी ठाकूर हे एका कर्मचाऱ्यांला दुचाकीने घेऊन आरोपी यांच्या घराजवळ पोहचले. दुचाकी दूरच ठेऊन पायदळ आरोपीच्या घरी पोहचले. घरी आरोपीची आई होती. परंतु समोरूनच आरोपी अशोक आत्राम हा येत होता त्याला नाव विचारले असता अशोक लेतू आत्राम म्हणताच त्याला ताबडतोब ठाकूर यांनी दुचाकी वर बसवून सुसाट वेगाने पळवून गावाच्या बाहेर दूर घेऊन गेले. ठाणेदार सोनुने यांनी वरीष्ठना दिलेल्या महितीवरून 25 ते 30 पोलिसांच्या गाड्या भरून 200 ते 250 लोकांचा ताफा पांढरवाणी गावात पोहचला.
आरोपी अशोक आत्राम याला आणून पोलीस गाडीत बसविले व गावात इतर आरोपीचा शोध घेतला असता लेतू आत्राम हा सुद्धा सापडला. दोघांनाही अटक केले व वाघिणीचा पंजा व एक नख जप्त करून आणले. वाघिणीला शिकार करून मारने व जाळले तसेच समोरचे दोन्ही पंजे तोडून नेण्याची महाराष्ट्रतील पहिलीच घटना असल्याने याकडे मुख्यमंत्री यांचे सुद्धा लक्ष होते.
मुख्यमंत्री यांचे फोन जिल्हा पोलिस अधीक्षक याना होते त्यामुळे संपूर्ण पोलीस विभाग कामाला लागले होते. जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या विश्वसात मुकुटबनचे ठाणेदार व दोन्ही पोलीस कर्मचारी खरे उतरले. ठाणेदार धर्मा सोनुने ,ऋषी ठाकूर व दिलीप जाधव यांच्या उत्कृष्ट कामगिरीची प्रशंसा पालकमंत्री संदीपान भुमरे खासदार बाळू धानोरकर जिल्हाधिकारी अमोल येडगे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ दिलीप पाटील भुजबळ यांनी केले व पोलीस अधीक्षक यांनी मुकुटबनच्या तपास टीम करीता 50 हजार रुपये बक्षीस म्हनुन घोषित केले.तसेच वानविभागातर्फे सुद्धा मुकुटबनच्या टीमला बक्षिस देणार आहे. सदर कार्यवाहि मुळे मुकुटबन पोलीस स्टेशनचा महाराष्ट्रात लौकिक झाला आहे.
दोन्ही आरोपींना पकडून वानविभाकडे सुपूर्त करण्यात आले आहे. वनविभागाने 10 दिवसाचा( FCR) फॉरेस्ट कास्टडी रिमांड मिळाला असून पुढील तपास वनपरीक्षेत्र अधिकारी विजय वारे करीत आहे.
हे देखील वाचा: