युवा शेतकऱ्यांची विष प्राशन करून आत्महत्या

मारेगाव तालुक्यातील बोदाड येथील धक्कादायक घटना

0

नागेश रायपुरे, मारेगाव: एका युवा शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील बोदाड येथे घडली. वैभव सुभाष लांबट (25) असे आत्महत्या करणाऱ्या युवा शेतकऱ्याचे नाव आहे.

बोदाड येथील सुभाष लांबट यांचा एकुलता एक मुलगा वैभव याने आपले शेतात टरबुजाचे पीक घेतले. परंतु सर्वत्र असलेल्या लॉकडाऊनने टरबूज पिकावर संकट ओढवले. या टरबुजाच्या शेतीने खाजगी स्वरूपाचे दोन ते तीन लाखाचे कर्ज झाल्याने तो आर्थिक विवंचनेत होता. वैभवने 2 मे रोजी दुपारच्या सुमारास स्वतःचे शेतात विष प्राशन केले.

दरम्यान घरच्यांनी वैभवला वणी येथे तत्काळ दवाखान्यात भरती केले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने वैभवला चंद्रपूर येथे हलविण्यात आले . परंतु संध्याकाळी 7 वाजता उपचारादरम्यान वैभवची प्राणज्योत मालवली. शांत व सयंमी स्वभाव असलेल्या वैभवच्या अचानक मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेदेखील वाचा

वाघिणीच्या शिकार प्रकरणी मुकुटबन पोलिसांना 50 हजारांचे बक्षीस

हेदेखील वाचा

आत्महत्या टाळता येईल….

हेदेखील वाचा

आत्महत्या हा पहिला किंवा शेवटचाही मार्ग नाही…

हेदेखील वाचा

लॉकडाऊनमध्ये मयूर मार्केटिंगतर्फे ऑनलाईन सेवा सुरू

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!