शासनाकडून विषबाधित शेतक-यांची थट्टा

उपचार खर्च 70 हजार, शासनाची मदत फक्त 5 हजार रुपये

0
ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यात सत्तरच्या वर शेतक-यांना किटकनाशकाच्या फवारणीतुन विषबाधा झाली असुन हे शेतकरी विविध रुग्णालयात उपचार घेत आहे. या शेतक-यांना खासगी रुग्णालयात सुमारे 50  हजार ते 70 हजार रूपयांपर्यंत खर्च आला आहे. मात्र विषबाधित शेतकऱ्यांना फक्त 5 हजार हजार रुपयांचा धनादेश दिल्याने शेतक-यांचे डोळे पांढरे झाले आहेत.
मारेगाव तालुक्यातील टाकळखेडा येथील शेतकरी अशोक किसन आंबाडे या शेतकऱ्या कडे स्वतः च्या नावावर पाच एकर शेती आहे. त्या शेतकऱ्याने दि.२३ सप्टेंबर २०१७ ला आपल्या शेतात पोलो नावाच्या कीटकनाशकाची फवारणी केली होती. फवारणी करताना त्यांना विषबाधा झाली. त्यामुळे त्यांना प्रथम मारेगाव ग्रामीण रुग्नालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. नंतर त्यांना पुढील उपचाराकरीता वणी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना त्यांना उपचारासाठी सुमारे 70 हजारांचा खर्च आला. उपचाराचा खर्च आणि औषधीची बिलं त्यांनी सादरही केली.
फवारणी दरम्यान मृत झालेल्या आणि गंभीर असलेल्या शेतक-यांना शासनातर्फे मदत जाहीर झाली. जेव्हा अशोक आंबाडे यांच्याकडे शासनाची मदत पोहोचली तेव्हा त्यांचे डोळे पांढरे झाले. कारण त्यांना शासनाकडून केवळ 5 हजारांचा धनादेश मिळाला. शासनाकडून सध्या शेतक-यांची क्रुर थट्टा सुरू आहे. अनेक विषबाधीत मृत शेतक-यांना शासनाची मदतही मिळाली नाही. तसेच आता फवारणी दरम्यान गंभीर असलेल्या शेतक-यांना केवळ पाच हजारांची मदत देऊन शासनानं शेतक-याची थट्टा केली आहे. याप्रकरणी परिसरात संताप व्यक्त होत असून शेतक-यांना योग्य ती मदत केली नाही तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा प्रवीण खानजोडे, अजय धोबे, विकेश पानघाटे, रुद्रा कुचनकर, सिद्दीक रंगरेज, अखिल सातोकर इ. शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी दिला आहे. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.