यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा कायर तर्फे थेट कर्ज वाटप

शेतक-यांना बोलवून पीक कर्ज वाटप

0

सुशील ओझा, झरी: वणी तालुक्यातील कायर शाखा मध्यवर्ती बँके तर्फे विभागीय अध्यक्ष राजू येल्टीवार यांच्या हस्ते बोपापूर ग्राम विकास कार्यकारीच्या सभासदांना बँक मध्ये बोलावून कर्ज देण्यात आले.

कर्ज घेणारे दोन्ही शेतकरी राजू देवाळकर व दीपक पानघाटे या शेतकऱ्यांना प्रत्येकी 25 हजार तर इतर दोन शेतकऱ्याला 60 हजार असे कर्ज वाटप करून पीक कर्जाला सुरवात केली.

त्यावेळी राजू येल्टीवार यांच्या सोबत राजू कासावर हे सुद्धा उपस्थित होते. रवी ढेंगळे, अनिल चांदेकर ग्रामविकास अध्यक्ष अरुण देवळकर व बँक कर्मचारी गोवारदीपे, पारखी साहेब, अतुल बदखल, मांडवकार मॅडम यांनी सहकार्य केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

हे देखील वाचा:

कोरंबी (मा.)चे सरपंच विकास भोंगळे यांचे निधन

झरी तालुक्यात देशी दारूच्या दुकानातून जास्त दराने दारूची विक्री

 

Leave A Reply

Your email address will not be published.