झरी तालुक्यात देशी दारूच्या दुकानातून जास्त दराने दारूची विक्री

लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांची आर्थिक लूट

0

सुशील ओझा, झरी: तालुक्याती गोरगरीब जनतेकडून जास्त प्रमाणात पैसे उकळून परवाना धारक देशी दारू दुकानदार जनतेची मोठ्या प्रमाणात लूट करीत आहे. शासनाने 55 रुपयाचा देशी दारूचा पव्वा 60 केला आहे, परंतु तालुक्यातील देशी दारू दुकानदारांनी शासनाच्या पलीकडे 60 रुपयाचा पव्वा 70 रुपये दराने विक्री करणे सुरू केले आहे.

तालुक्यात मुकुटबन 2, पाटण 1, मांगली 1, झरी 1, माथार्जुन 1 व सतपेल्ली 1 असे सात परवाना धारक देशी दारूचे दुकान आहे. दोन दुकानातून 65 रूपये शिशी व पाच दारु दुकानातून 70 रूपये पव्वा (शिशी) विक्री करीत आहे.

लॉकडाऊन मध्ये 15 दिवस सर्व दारूचे दुकाने बंद होते. त्यामुळे काळाबाजारीला चांगलाच ऊत आला होता. याकाळात ग्राहकांनी देशीचा पव्वा 200 रुपयांपर्यंत विकत घेतला होता. मात्र आता शासनाने दारूविक्रीला परवानगी दिली, त्यानंतर तरी दारुच्या काळाबाजारी थांबेल अशी आशा होती. मात्र आता दुकानदार ग्राहकांकडून 10 रुपये अधिकचे आकारत आहे.

घरपोच सेवा केवळ कागदोपत्री
शासनाने दारूविक्रेत्यांना केवळ घरपोच दारूविक्रीची परवानगी दिली आहे. मात्र ग्राहकांना दुकानातूनच ग्राहकांना दारू विक्री सुरू आहे. घरपोच सेवेत एकही रुपया न वाढवता दारुची विकी करण्याचे आदेश असताना 10 वाढून विक्री सुरू आहे. त्यामुळे संबंधीत विभाग काय करीत आहे असा प्रश्न ग्राहकांकडून विचारला जात आहे.

हे देखील वाचा:

कोरंबी (मा.)चे सरपंच विकास भोंगळे यांचे निधन

उधारीचे पैसे मागितल्याने युवकाची महिलेस मारहाण

Leave A Reply

Your email address will not be published.