नितीन गडकरींतर्फे 4 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट

वणी, मारेगाव, झरी परिसरातील रुग्णांना होणार फायदा

0

जितेंद्र कोठारी, वणी: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वणी विधानसभा क्षेत्रासाठी ऑक्सिजन निर्माण करणारी 4 ऑक्‍सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन भेट केली. नितीन गडकरी यांनी रविवार 15 मे रोजी नागपूर येथील आपल्या निवासस्थानी ऑक्‍सिजन कॉन्सन्ट्रेटर वणी विधानसभेचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या सुपूर्द केले. या प्रसंगी दै. तरुण भारतचे प्रबंध संचालक धनंजय बापट प्रामुख्याने उपस्थित होते. या सयंत्रामुळे वणी, मारेगाव, झरी परिसरातील अनेक कोरोना रुग्णांना जीवदान मिळणार आहे.

वणी विधानसभा क्षेत्रातील वणी, मारेगाव, झरी तालुक्यात कोरोना रुग्णांची चिंताजनक वाढ होत आहे. या क्षेत्रातील कोरोना रुग्णांना दिलासा देण्यासाठी आ .बोदकुरवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेकडे ऑक्सिजन निर्मितीचे सयंत्र देण्याची मागणी केली होती. या मागणीला प्रतिसाद देत नितीन गडकरी यांनी पहिल्या टप्प्यात 4 सयंत्रे दिली आहेत.

कोरोनाच्या विळख्यातून या परिसरातील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आ. बोदकुरवार यांनी आरोग्य सुविधेसाठी आमदार निधीतून एक कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहे. त्यातून वणी येथील ट्रामा केअर सेंटर मध्ये 50 ऑक्सिजन युक्त खाटांचे डेडिकेटेड कोरोना रुग्णालय तयार करण्यात आले आहे. या सोबत वणी तालुक्यात परसोडा येथे सुद्धा कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गडकरी यांच्या कडून मिळालेल्या 4 सयंत्रामधून दोन सयंत्र वणी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे व इतर दोन सयंत्र झरी व मारेगाव तालुक्यासाठी सुपूर्द करण्यात येणार आहेत.

वणी तालुक्यासोबत झरी व मारेगाव तालुक्यात सुद्धा कोविड रुग्णाची संख्या वाढत आहे. तेथील रुग्णालयाच्या अत्यावश्यक बाबीसाठी आ. बोदकुरवार यांनी दिलेल्या प्रत्येकी 25 लाखातून वैद्यकीय साहित्यांची उपलब्धता करून देण्यात आली आहे. या तालुक्याला मिळणाऱ्या प्रत्येकी एक सयंत्राचा रुग्णांना उपयोग होणार असून या सोबत एक रुग्णवाहिका व ऑक्सिजन निर्मितीचे अधिक पाच सयंत्र सुद्धा उपलब्ध करून देण्याची ग्वाही गडकरींनी ही सयंत्रे हस्तांतरित करतांना दिली आहे.

हे देखील वाचा:

महाराष्ट्र बँक चौकातील टाईम्स फोटो स्टुडिओ सील

मारेगाव तालुक्याला दिलास, आज केवळ 1 पॉझिटिव्ह

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.