जब्बार चीनी, वणी: वणी येथे कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस कमी होत आहे. यात मुख्यत: वणी शहरातील रुग्णसंख्येचा दर झपाट्याने कमी होत आहे. आज तालुक्यात अवघे 29 रुग्ण आढळले आहेत. यातील अवघा एक रुग्ण वणी शहरात आढळला आहे. वणी शहरात गेल्या तीन दिवसात 16, 4 व 1 रुग्ण आढळलेत. मात्र ग्रामीण भागात कोणत्या ना कोणत्या गावात रुग्णसंख्या वाढल्याने ग्रामीण भागातील रुग्ण संख्या कमी होण्याचा वेग कमी आहे. आज ग्रामीण भागात 27 रुग्ण आढळलेत. यातील एकट्या मेंढोली येथे 18 रुग्ण आढळले आहेत. याशिवाय आज 138 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. सध्या ग्रामीण भागात कोरोना टेस्ट कॅम्प घेणे सुरू असल्याने ज्या गावात कॅम्पचे आयोजन होत आहे त्या गावात रुग्णसंख्या येताना दिसत आहे. ठिकठिकाणी कॅम्प व अधिकाधिक टेस्टमुळे रुग्णसंख्या जरी वाढत असली तरी वेळीच निदान झाल्याने कोरोनाचा प्रसार कमी होण्यास मदत होत आहे. दरम्यान आज एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

वणी शहरात आलेला एक रुग्ण हा जैन ले आऊट येथील आहे. तर ग्रामीण भागात आलेल्या 27 रुग्णांमध्ये एकट्या मेंढोली येथे 18 रुग्ण आढळलेत. तर वरझळी येथे 4, बेलोरा येथे 2 रुग्ण तर कृष्णानपूर, बेसा, चिखलगाव येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. तर खैरी येथील एक व्यक्ती वणीत पॉझिटिव्ह आला आहे.
आज यवतमाळ येथून 200 अहवाल प्राप्त झालेत. यात 6 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. याशिवाय आज 119 संशयीतांची रॅपिट ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात 6 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून 137 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 1494 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.
सध्या तालुक्यात कोरोनाचे 556 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 74 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 405 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 77 रुग्णांवर यवळमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 4756 रुग्ण आढळून आलेत. यातील 4121 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 79 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.
हे देखील वाचा: