सासुरवाडीला निघालेल्या तरुणावर काळाचा घात

पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

1

जितेंद्र कोठारी, वणी : माहेरी गेलेल्या पत्नीला आणण्यासाठी दुचाकीने सासुरवाडीला निघालेल्या तरुणाला भरधाव पिकअप वाहनाने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला. वणी-वरोरा मार्गावर नायगावजवळ गुरुवारी सायंकाळी 5 वाजता दरम्यान हा अपघात घडला. नीलेश नामदेव मिलमिले (32) असे अपघातात ठार युवकाचे नाव आहे.

Podar School 2025

प्राप्त माहितीनुसार भद्रावती तालुक्यातील बोमठाणा येथील नीलेश नामदेव मिलमिले याची वणी तालुक्यातील कुरई येथे सासुरवाडी आहे. नीलेशची पत्नी काही दिवसांपासून कुरई येथे होती. त्यामुळे नीलेश गुरुवार 3 जून रोजी सायंकाळी आपली दुचाकी क्र. (MH29BG6129) ने पत्नीला आणण्यासाठी निघाला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

वणी-वरोरा मार्गावर सावर्ला गावाजवळ वणीमार्गे भरधाव येणारे महिंद्रा पिकअप वाहन (MH29BE0238)च्या चालकाने निलेशच्या दुचाकीला धडक दिली. जोरदार धडकीमुळे दुचाकीस्वार नीलेश मिलमिले हा जागीच ठार झाला. अपघाताची माहिती मिळताच वणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करून पोस्टमार्टमसाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. पुढील तपास ASI जगदीश बोरनारे करीत आहे.

हेदेखील वाचा

मुकुटबन येथील सिमेंट कारखान्याचे भवितव्य अंधारात ?

हेदेखील वाचा

तालुक्यातील 45 वर्षांवरील प्रत्येक नागरिकांनी कोविड लस घ्यावी

हेदेखील वाचा

बांम्बर्डा गावाला जोडणाऱ्या पुलाची अवस्था जीर्ण

 

Leave A Reply

Your email address will not be published.