वणी तालुक्यात आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

युवासेनेतर्फे वृक्षारोपण, फळवाटप व कोरोना योद्ध्यांचा सत्कार

0

विवेक तोटेवार, वणी: राज्याचे पर्यावरण मंत्री तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालु्क्यात शिवसेना प्रणीत युवासेनेतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. वाढदिवसानिमित्त वणी येथील ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप करण्यात आले. तसेच कोरोना काळात फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून सेवा देणा-या डॉक्टर, नर्स व कर्मचा-यांचा  सत्कारही करण्यात आला.  तर कायर व शिरपूर येथे वृक्षारोपण करण्यात आले.

सदर कार्यक्रम शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांच्या मार्गदर्शनात व युवासेनेचे जिल्हा प्रमुख विक्रांत चचडा यांच्या पुढाकारातून घेण्यात आला. सकाळी ग्रामीण रुग्णालयात युवासेनिकांनी रुग्णांना फळ वाटप केले. दरम्यान डॉक्टर, नर्स यांचा कोरोना काळात दिलेल्या सेवेबाबत सन्मान करण्यात आला. कायर परिसरात उपजिल्हा प्रमुख कुंदन टोंगे यांचा हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तर शिरपूर येथे युवासैनिकांनी वृक्षारोपण केले.

कार्यक्रमाला युवासेना तालुका समन्वयक अनुप चटप, युवासेना उपशहर प्रमुख सौरभ खडसे, युवासेना शहर संघटक कुणाल लोणारे, शहर समन्वयक बंटी सहानी, शिवसेना व्यापारी आघाडी जिल्हा संघटक हिमांशू बतरा, अमीत लिचोडे उपशहर प्रमुख, सचिन पाटील, महेश गिरतकर, हर्षल चांदेकर, अथर्व ठामके, साई बलचेवार, आकाश कोंडेवार, आकाश उईके यांच्यासह युवासैनिक, पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

कायर येथे युवासैनिकांतर्फे वृक्षारोपण करण्यात आले

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

हे देखील वाचा:

स्थानिक कलाकारांची शॉर्ट फिल्म ‘रेडियो 1947’ चा टिझर प्रकाशित

विविध उपक्रम राबवून आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस साजरा

Leave A Reply

Your email address will not be published.