विविध उपक्रम राबवून आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस साजरा
मारेगावात कोरोना योद्ध्यांचा सन्मान, रुग्णालयात फळवाटप
नागेश रायपुरे, मारेगाव: राज्याचे पर्यावरण मंत्री तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालु्क्यात शिवसेना प्रणीत युवासेनेतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. वाढदिवसानिमित्त मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप करण्यात आले. रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच कोरोना काळात फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून सेवा देणा-या कोरोना योद्ध्यांचा सत्कारही करण्यात आला.
कोरोनामुळे आदित्य ठाकरे यांनी कोणताही बडेजाव न करता वाढदिवस साजरा करण्याचा आदेश दिला होता. त्यावरून मारेगाव येथे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांच्या मार्गदर्शनात व युवासेना जिल्हा प्रमुख विक्रांत चचडा यांच्या पुढाकारातून घेण्यात आला. तहसिलदार, ठाणेदार साहेब, व मारेगाव शहरात स्वछतादूत सुरेखाबाई यांच्या कोरोनादूत म्हणून सत्कार करणात आला.
कार्यक्रमाला मारेगाव शहराच्या माजी नगराध्यक्षा रेखाताई मडावी, शिवसेना उपतालुकाप्रमुख राजूभाऊ मोरे, मस्की काका, युवासेना तालुकाप्रमुख मयूरभाऊ ठाकरे, युवासेना तालुका संघटक श्रीकांत सांबजवार, युवासेना शहर प्रमुख गणेश आसुटकर, दिगंबर नावडे, पंकज बल्की, अनिकेत मानकर, रवी कूचनकार, अनिकेत चोपने, आकाश दभरे तथा तालुक्यातील अनेक पदाधिकारी व शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते.
हे देखील वाचा:
स्थानिक कलाकारांची शॉर्ट फिल्म ‘रेडियो 1947’ चा टिझर प्रकाशित