नागेश रायपुरे, मारेगाव: महिला आर्थिक विकास महामंडळ यवतमाळ महाराष्ट्र शासन अंगीकृत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले लोकसंचालीत साधन केंद्र मारेगाव, GIZ प्रकल्पा अंतर्गत मारेगाव तालुक्यातील गरजुवंत शेतकरी महिलांना मोफत बि- बियाणे व खतांचे वाटप करण्यात आले. वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे हस्ते येथील खरेदी विक्री संघामध्ये हे बियाणे वाटप करण्यात आले. तालुक्यातील महिला शेतकऱ्यांना सोयाबीन कापुस पिकाचे बि-बियाणे, खते असे प्रत्येकी पाच हजार च्या किट प्रमाणे जवळपास 200 महिला शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले.
सावित्रीबाई फुले साधन केंद्र मारेगाव च्या वतीने यापूर्वी अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. कोविड 19 च्या लॉकडाऊन काळातही तालुक्यातील शेकडो गरजूवंत कुटूंबाना अन्न धान्य किराणा किट वाटप सुद्धा करण्यात आले होते.
तालुक्यातील काही शेतकरी ऐन बियाणे पेरणी च्या वेळी आर्थिक अडचणीत आला होता.मात्र त्याची दखल घेत,महिला आर्थिक विकास महामंडळ यवतमाळ अंतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले लोकसंचालीत साधन केंद्र मारेगाव मार्फत योग्य वेळी तालुक्यातील गरजुवंत महिला शेतकऱ्यांना बि-बियाण्याचे मोफत वाटप केल्याने लाभार्थी शेतकरी सुखावला गेला आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, जिल्हा समनव्यक अधिकारी डॉ. रंजना वानखेडे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष यशोधरा लिहितकर होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून बॅंकेच्या बनसोड होत्या. कार्यक्रमाचे संचालन संगीता डाहुले यांनी केले तर आभार अनिता वसाके यांनी मानले. कार्यक्रमासाठी लेखापाल कार्तिक चौधरी, सीबीआरसीच्या व्यवस्थापक संगीता डाहुले, सयोंगिनी अनिता वसाके, विशाखा वैरागडे, अनिता मलेलवार, प्राची मुन आदींनी परिश्रम घेतले.
हे वाचलंत का?