जब्बार चीनी, वणी: देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. पेट्रोल डिजेल पाठोपाठ आता खाद्यतेल आणि इतर गोष्टींचेही दर गगणाला भिडले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे असा आरोप करत याविरोधात वंचित बहुजन आघाडी पक्षातर्फे वणीत सोमवारी दिनांक 21 जून रोजी सकाळी 11 वाजता धरणे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन वंचिततर्फे करण्यात आले आहे.
कोरोना व लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात व्यवसाय ठप्प पडले आहे. व्यापा-यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सर्वसामान्यांची मजुरी बुडाली आहे. कामधंदे नसल्याने लोक बेरोजगार झालेत. अशा वेळी सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याऐवजी सतत भाववाढ होत आहे. सरकारने खाद्यतेल, पेट्रोल डिजेल याशिवाय इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढवून सर्वसामान्यांचे जगणे कठीण केले आहे.
या महागाईच्या विरोधात ऍड प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शानात संपूर्ण महाराष्ट्र भर धरणे आंदोलन होणार आहे. वणीत देखील हे आंदोलन करण्यात येणार आहे. स्थानिक शिवाजी पुतळ्यासमोर सकाळी 11 वाजता धरणे देण्यात येणार आहे.
आंदोलनात मोठ्या संख्येने हजर राहावे असे आवाहन वंचितचे मंगल तेलंग, विप्लव तेलतुबडे, मिलिंद पाटील, दिलीप भोयर, किशोर मून, सतीश गेडाम, नरेंद लोणारे, प्रदीप खैरे, शंकर रामटेके, चंद्रसेन जीवने, कपिल मेश्राम, सुषमा दुधगवळी, करुणा कांबळे, डोंगरे, अर्चना कांबळे, प्रतिभा मडावी, निशिकांत पाटील यांच्यासह वंचितचे पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.
हे देखील वाचा: