नातेवाईकांकडे जाते म्हणून निघालेली मुलगी घरी परतलीच नाही

राजूर (कॉ) येथील घटना, मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा संशय

0

जितेंद्र कोठारी, वणी: नातेवाईकांकडे जाते असे सांगून घरून निघालेली अल्पवयीन मुलगी घरी परतलीच नाही. राजूर कॉलरी येथे ही घटना घडली. याबाबत वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुलीला फुस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

राजूर कॉलरी येथे अल्पवयीन मुलगी राहते. ती 11 व्या वर्गात शिकते. अल्पवयीन मुलगी ही गुरुवारी दिनांक 17 जून रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास घरून मोठे बाबाकडे जाते असे सांगून निघाली. मात्र बराच काळ लोटूनही ती घरी परतली नाही. दरम्यान तिच्या पालकांनी तिच्या मोठेबाबांना कॉल करून विचारणा केली असता ती घरी आलीच नसल्याचे त्यांनी सांगितले.

यामुळे तिच्या पालकांना धक्का बसला. त्यांनी जवळच्या व्यक्तींकडे तसेच तिच्या मैत्रिणीकडे विचारणा केली. मात्र तिच्याबाबत काहीही माहिती नसल्याचे त्यांना कळले. दोन दिवस त्यांनी आणखी शोध घेतला. पण मुलीबाबत काहीही माहिती मिळाली नाही. अखेर तिच्या पालकांनी शनिवारी संध्याकाळी पोलीस स्टेशन गाठले व त्याबाबत तक्रार दिली. मुलीला फुस लावून पळवल्याचा संशय वडिलांनी व्यक्त केला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भादंविच्या कलम 363 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकऱणाचा तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात एपीआय माया चाटसे करीत आहे.

हे देखील वाचलंत का?

पुनवटजवळ रेतीची अवैध वाहतूक करणा-या ट्रॅक्टरवर कारवाई

सर्वात कमी किमतीत शेतीच्या कुंपणासाठी झटका मशिन उपलब्ध

Leave A Reply

Your email address will not be published.