गटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे यांची जिल्हा परिषद शाळेला भेटी
कोरोनाच्या उपाययोजनेबाबत शिक्षकांना केले मार्गदर्शन
सुशील ओझा, झरी: संपूर्ण महाराष्ट्रात 28 जून पासून इनलाईन शाळा सुरू झाली आहे. त्यामुळे शिक्षकांना शाळेत हजर राहणे आवश्यक झाले आहे. “विद्यार्थी नाही परंतु शिक्षक शाळेत” अशी परिस्थिती सध्याची दिसत आहे. ऑनलाईन शिक्षण, स्वाध्याय उपक्रम, शिक्षणमित्र, अभ्यास गटाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होवु नये याकरिता या नवीन शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीलाच झरी पंचायत समिती जिल्हा परिषदचे गटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे यांनी जि. प. उच्च प्राथमिक शाळा झमकोला येथे भेट दिली. यावेळीत त्यांनी नव्या शैक्षणिक सत्रा त विद्यार्थी हिताच्या व कोरोणा काळात मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व त्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजना व कार्यवाही बाबत यथायोग्य मार्गदर्शन केले.
याशिवाय त्यांनी शालेय अभिलेखे तसेच ऑनलाईन शिक्षण बाबत मागील सत्रातील केल्या गेलेल्या उपायांचा आढावा घेतला व समाधान व्यक्त करून सर्व शिक्षकांना नव्या शैक्षणिक सत्राच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी गटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे यांचे पुष्पगुच्छ देऊन मुख्याध्यापक आनंदकुमार शेंडे यांनी स्वागत केले. यावेळी सतीश कुरेकार यांचेही शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी जि.प.उच्च प्राथमिक शाळा झमकोलाचे शिक्षक अमरदीप उपस्थित होते.
हे देखील वाचलंत का?