लालगुडा येथे कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन

270 व्यक्तींनी घेतली कोविडची लस

0

विवेक पिदूरकर, शिरपूर: ग्रामपंचायत कार्यालय लालगुडा येथे शनिवारी दिनांक 3 जुलै रोजी कोविड 19 लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला गावातील नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी नियोजित 270 लसीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. या लसीकरण शिबिराला ग्रामपंचायत सरपंच धनपाल चालखुरे व इतर सदस्य यांनी गावातील नागरिकांना लस घेण्याकरिता प्रोसाहित केले.

Podar School 2025

शिबिराला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास कांबळे यांनी भेट देऊन आरोग्य कर्मचा-यांना मार्गदर्शन केले. शिबिराला ग्रामपंचायत सचिव, आरोग्य कर्मचारी मौजा लालागुडा येथील तलाठी व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी योगदान दिले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

हे देखील वाचा:

Leave A Reply

Your email address will not be published.