सुशील ओझा, झरी/ पाटण प्रतिनिधी: पिवरडोल शेतशिवारात शौचास गेलेल्या एका तरुणावर वाघाने हल्ला करून त्याचा फडशा पाडला. सकाळी 6 वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. अविनाश पवन लेनगुरे (17) असे मृतकाचे नाव आहे. वृत्त लिहे पर्यंत (स. 8 वा.) वाघाची शिकार खाणे सुरूच होते. सदर घटना माहिती होताच घटनास्थळावर सुमारे 2 हजार लोकांची गर्दी झाली आहे.
झरी तालुक्यातील शेवटच्या टोकावर पाटणबोरीपासून 4 किलोमीटर अंतरवर पिवरडोल हे गाव आहे. गावात अविनाश पवन लेनगुरे (17) हा तरुण राहायचा. तो 10 वर्गात शिकत होता. काल (शनिवारी दिनांक 9 जुलै रोजी) रात्री 9 वाजताच्या सुमारास तो गावाला लागलेल्याच शेतशिवारात शौचास गेला होता. बराच वेळ होऊनही तो घरी न आला नाही. त्यामुळे त्याचे कुटुंबीय काही व्यक्तींना सोबत घेऊन शौचास जाण्याच्या ठिकाणी गेले.
मात्र अविनाश आढळून आला नाही. दरम्यान परिसरात अविनाशच्या कुटुंबीयांना वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले. सकाळी 5 ते 5.30 वाजताच्या सुमारास काही लोकांना अविनाशचे टमरेल, मोबाईल व रक्त आढळून आले. त्याच वेळी त्यांना झुडपातून त्यांना वाघ दिसला. त्यांनी तातडीने याची माहिती गावक-यांना, वनविभागाला व पोलीस स्टेशनला दिली.
रात्रीपासून शिकार सुरूच
सकाळी वाघाने हल्ला केल्याची माहिती पंचक्रोशीत पसरली. त्यामुळे परिसरातील लोकांनी एकच गर्दी केली. सुमारे 2 हजार लोकांची गर्दी घटनास्थळावर गोळा झाली आहे. वाघाचे अद्यापही शिकार खाणे सुरुच होते. अध्ये मध्ये वाघ झुडुपातून बाहेर येतो. घटनास्थळी वनविभागाची टीम, पाटण पोलिसांची टीम दाखल झाली आहे.
फोटो व्हिडीओ साभार – दशरथ बुरेवार
अपडेटेड बातमी…
हे देखील वाचा: