लो.टी. महाविद्यालय परिसरात पोलीस चौकी स्थापन करा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवेदन देऊन मागणी
जितेंद्र कोठारी, वणी: येथील वरोरा रोडवरील लोकमान्य टिळक महाविद्यालय परिसरात पोलीस चौकी स्थापन करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या बाबत उपविभागीय अधिकारी वणी यांना बुधवार 14 जुलै रोजी निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात महाविद्यालय परिसरात सडक छाप मजनू तसेच आवरागर्दी करणाऱ्या मुलांकडून महाविद्यालयीन विद्यार्थिनीची छेड काढण्याचे प्रकरण वाढत आहे. तसेच अनेक अल्पवयीन मुलं या मार्गावर सुसाट वेगाने दुचाकी चालवून बाईक स्टंट करताना रोजचे झाले आहे.
तालुक्यातील भालर, शिंदोला व राजूर येथून येणाऱ्या शालेय विद्यार्थी बसेसचा थांबा असलेल्या ठिकाणीही अशीच घटना होत आहे. त्यामुळे मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. अनेकदा वाद व तणावाचे वातावरण होत असल्याने मुलींच्या पालकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
लोकमान्य टिळक महाविद्यालय परिसरात पोलीस चौकी स्थापन केल्यास चिडीमारीच्या घटनेत आळा बसेल.
शहरातील शालेय व महाविद्यालयीन मुलींच्या सुरक्षिततेसाठी लवकरात लवकर पोलीस चौकी सुरु करण्यात यावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष सूर्यकांत खाडे, डॉ. महेंद्र लोढा, जयसिंग गोहोकार, राजाभाऊ बिलोरिया, रामकृष्ण वैद्य, विजया आगबत्तलवार, सविता ठेपाले, मारोती मोवाडे, वैशाली तायडे, मुस्कान पोन्नलवार, समीर खान यांनी केली आहे.
हे देखील वाचा:
येनक खून प्रकरणाचे गुढ उलगडले, अवघ्या दोन तासांमध्ये प्रकरणाचा छडा