मोहदा येथे तुटलेल्या वीज केबलचा स्पर्श होऊन बैलाचा मृत्यू

शेतक-यांचे 1 लाखांचे नुकसान, क्रशर मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

0

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील मोहदा येथील गिट्टी खदान क्षेत्रात वीज केबलचा स्पर्श होऊन बैलबंडीला जुंपलेला बैल मरण पावला. या घटनेत शेतकरी रवींद्र राजूरकर या शेतक-याचे एक लाखाचे नुकसान झाले आहे. याबाबत तक्रार शिरपूर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी गिट्टी खाण मालक इस्माईल झवेरी, रा. चंद्रपूर विरुद्द गुन्हा दाखल केला आहे.

प्राप्त माहितीनुसार मोहदा येथे अनेक गिट्टी खाणी आहे. पाऊसकाळत गिट्टी खाणीमध्ये पाणी भरल्यामुळे उत्खनन होत नाही. त्यामुळे खाण मालक इलेक्ट्रीक व डिझल पंपाद्वारे रात्र दिवस पाणी उपसा करतात. मोहदा ते बाबापूर पांदण रस्त्यावर झवेरी यांची विदर्भ मायनिंग प्रोजेक्ट नावाने क्रशर व गिट्टी खाण आहे.

झवेरी यांनी गिट्टीखाणी मधून पाणी उपसासाठी टाकलेली मोटरचे केबल पांदण रस्त्याच्या मधून दिले होते. दि. 12 जुलै रोजी मोहदा येथील शेतकरी रवींद्र रामदास राजूरकर यांचा सालगडी नेहमीप्रमाणे बैलबंडी घेऊन शेतामध्ये गेला होता. सकाळी 11 वाजता अचानक पाऊस सुरु झाल्यामुळे सालगडी देवराव कोडापे हा बैलबंडी घेऊन परत घराकडे निघाला.

वाटेतच इस्माईल झवेरी यांच्या खदानीजवळ पांदण रस्ता खोदून टाकलेली वीज केबलवर बैलाचा पाय पडला. वीज केबल तुटून असल्यामुळे 440 व्होल्टेज विजेचा झटका बैलाला बसला व तो जागीच गतप्राण झाला. धड धाकट बैल मेल्यामुळे शेतकरी रवींद्र राजूरकर यांचे एका लाखाचे नुकसान झाले.

बैलाच्या मृत्यूस खाणपट्टाधारक इस्माईल झवेरी हे पूर्णपणे जवाबदार असल्याने त्यांचेवर योग्य कारवाई व नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी राजूरकर यांनी शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी इस्माईल झवेरी, रा. तुकुम वार्ड चंद्रपूर विरुद्द भादवी कलम 429 अनव्ये गुन्हा दाखल केले आहे. घटनेचा तपास जमादार एन. डी. आडे करीत आहेत.

हे देखील वाचा:

येनक खून प्रकरणाचे गुढ उलगडले, अवघ्या दोन तासांमध्ये प्रकरणाचा छडा

स्नेहनगरीत झुकलेला खांब देतोय दुर्घटनेला आमंत्रण

Leave A Reply

Your email address will not be published.