दहावीच्या निकालाने केली परिसरातील विद्यार्थ्यांची निराशा…
साईट क्रॅशने आणले विद्यार्थ्यांच्या आनंदावर विरजण
जितेंद्र कोठारी, वणी: महाराष्ट्र राज्य बोर्डाचा माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (SSC) दहावीचा निकाल आज ऑनलाईन जाहीर झाला. बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी 1 वाजता निकाल जाहीर करण्यात आला. मात्र निकाल येण्यापूर्वीच संकेतस्थळ क्रश झाल्यामुळे हजारो विद्यार्थी आपले निकाल बघण्यास मुकले आहे. सायंकाळी 6 वाजे पर्यंत बोर्डाची अधिकृत वेबसाईट http://result.mh-ssc.ac.in आणि http://www.mahahsscboard.in उघडत नव्हती.
वणी तालुक्यातील 42 शाळांमधील 2427 विद्यार्थ्यांचे निकाल बोर्डातर्फे जाहीर करण्यात आले. त्यात 889 विद्यार्थी प्रथम श्रेणी, 1325 विद्यार्थी द्वितीय श्रेणी तर 213 विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. वणी तालुक्यात दहावीचा 100 टक्के निकाल लागल्याची माहिती मिळाली आहे. दहावी व बारावीच्या निकालात दरवर्षी मुली बाजी मारतात. मात्र यंदा वेबसाईट क्रश झाल्यामुळे बाजी मुलींनी मारली की मुलांनी ?हे कळू शकले नाही.
कोरोना साथीच्या आजारामुळे महाराष्ट्र राज्य मंडळाने यंदा माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे विद्यार्थ्यांना गुण देण्यात आले आहे. यावर्षी दहावीतील विद्यार्थ्यांचे मूल्यांकन गृहकार्य, मौखिक कामगिरी आणि 9 वीच्या परीक्षेनुसार करण्यात आले आहे.
हे देखील वाचा:
एका कारवाईतून मिळाले दुस-या कारवाईचे धागेदारे, उघड झाली मोठी तस्करी