वणीत वंचित बहुजन आघाडीची परिचय सभा संपन्न

मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिका-यांची उपस्थिती

0

जब्बार चीनी, वणी: नुकतिच वंचित बहुजन आघाडीची ताकुला कार्यकारिणी गठीत झाली. त्यानंतर पहिल्यांदाच शुक्रवारी दिनांक 16 जुलै रोजी स्थानिक विश्राम गृहात परिचय सभेचे आयोजन करण्यात आले. दुपारी झालेल्या या परिचय सभेचे अध्यक्ष नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष दिलीप भोयर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाउपाध्यक्ष मंगल तेलंग, जिल्हा संघटक सुभाष लसंते होते.

यावेळी वृक्षभेट देऊन नवनिर्वाचित पदाधिका-यांचे स्वागत करण्यात आले. सभेत मान्यवरांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याना पक्षवाढी संदर्भात मार्गदर्शन केले. तर शेतकऱ्यांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करून वंचित बहुजन आघाडीने पुढील वाटचाल करावी असे प्रतिपादन दिलीप भोयर यांनी केले. तालुका महासचिव सतीश गेडाम, मिलिंद पाटील, चंद्रकला उराडे यांनीही आपले मनोगत व्यक्त कले.

सभेचे प्रास्ताविक मिलिंद पाटील यांनी केले तर सूत्रसंचलन किशोर मुन यांनी केले. आभार प्रशिल तांमगाडगे यांनी मानले. यावेळी बाळू निखाडे, निशिकांत पाटील, प्रतिभा मडावी, जिया अहेमद, भारत कुमरे, शंकर तामगाडगे, उमेश परेकार, हर्षवर्धन खैरे, निखिल चाफळे यांच्यासह वंचितचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हे देखील वाचा:

एका कारवाईतून मिळाले दुस-या कारवाईचे धागेदारे, उघड झाली मोठी तस्करी

लग्नासाठी गेले पनवेल, चोरट्यांचे झाले ऑल ईज वेल….

Leave A Reply

Your email address will not be published.