सरपंच सेवा महासंघच्या महिला तालुकाध्यक्षपदी मीना आरमुरवार
सरपंचांच्या न्याय व हक्कासाठी काम करणार: आरमुरवार
सुशील ओझा, झरी: सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्रची यवतमाळ जिल्ह्यातील कार्यकारिणी नुकतिच जाहीर करण्यात आली. यात झरी तालुका महिला अध्यक्षपदी मीना जगदीश आरमुरवार यांची नियुक्ती करण्यात आली
तालुक्यातील सरपंचांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहिल अशी प्रतिक्रिया यावेळी मीना आरमुरवार यांनी दिली. सरपंच सेवा महासंघ यवतमाळ जिल्हा अध्यक्षा वर्षा निकम यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
मीना आरमुरवार आपल्या नियुक्तीचे श्रेय राज्याध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे, राज्यसंपर्क प्रमुख राहुल उके, राज्य कार्यकारिणी सदस्य किशोर धामंदे, यवतमाळ जिल्हा उपाध्यक्षा सीमा आवारी यांना देते. त्यांच्या नियुक्तीमुळे सर्व स्तरातून अभिनंदाचा वर्षाव होत आहे. सरपंच सेवा महासंघ ही संघटना सरपंचाच्या न्याय व हक्कासाठी लढणारी महाराष्ट्रातील एकमेव नोंदणीकृत संघटना आहे.
हे देखील वाचा: