सेवानिवृत्त पोलिसाच्या दुचाकीच्या डिक्कीतून 45 हजार रुपये लंपास

बँकेतून काढलेल्या पैशावर अज्ञात चोरट्यांचा डल्ला

0

विवेक तोटेवार, वणी: सेवानिवृत्त पोलीस कर्मचा-याच्या दुचाकीच्या डिक्कीतून 45 हजार रुपये चोरट्यांनी  लंपास केले. आज सोमवारी दुपारी 12 ते 1 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

श्रीराम पुनवटकर (61) हे सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी आहे. 2 ते अडीच वर्षांपूर्वी ते वणीतील वाहतूक विभागातून सेवानिवृत्त झाले. ते रविनगर येथे राहतात. आज दुपारी ते शहरातील टागोर चौक परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडिया (मुख्य शाखा) येथे पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांनी बँकेतून 45 हजार रुपये काढले. त्यांनी ते पैसे दुचाकीला असलेल्या बॅगमध्ये ठेवले व ते घरी जाण्यास निघाले.

काही अंतरावर गाडी गेल्यावर त्यांना गाडीला लावलेल्या बॅगची चैन उघडी असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी बॅगमध्ये बघितले असता त्यांना बँकेतून काढलेले पैसे लंपास झाल्याचे आढळून आले. त्यांनी त्वरित पोलीस स्टेशन गाठले व याबाबत तक्रार दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हे देखील वाचा:

आता अवघ्या 1.5 हजारात कुंपन झटका मशिन

बांधकाम विभागाचा महावितरणला 7 दिवसांचा अल्टिमेटम

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.