वणीत मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धाचे आयोजन
200 स्पर्धकांनी घेतला स्पर्धेत सहभाग
जितेंद्र कोठारी, वणी: राज्याचे मुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज 27 जुलै मंगळवारला वणी येथे भव्य मॅराथॉन दौड स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. शिवसेना शहर प्रमुख राजू तुराणकर यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.
ही स्पर्धा खुला गट (मुले, मुली) व 18 वर्षाखालील (मुले, मुली) अशा दोन गटात घेण्यात आली. सकाळी 7 वाजता शिवतीर्थ येथून या दौडला सुरुवात झाली. खुल्या गटातील स्पर्धकांनी शिवाजी चौक ते साई नगरी, ब्राह्मणी फाटा, टोल प्लाझा, बाजार समिती ते परत शिवाजी चौक असा या दौडचा मार्ग होता.
तर 18 वर्षाखालील स्पर्धकांचा शिवाजी चौक ते महावीर भवन ते बाजार समिती व तिथून परत शिवाजी चौक असा मार्ग होता. दोन्ही गटातील प्रत्येकी 10 विजेत्यांना बक्षिसे देण्यात आले. या भव्य मेराथॉन स्पर्धा कार्यक्रमाचे अध्यक्ष इंदीरा सहकारी सुतगिरणीचे अध्यक्ष तसेच शिवसेना वणी विधानसभा संघटक सुनिल कातकडे होते.
प्रमुख पाहुणे संजय देरकर आणि कार्यक्रमाचे संयोजक शहर प्रमुख राजू तुराणकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हारार्पणकरून तथा खेळाडूंना हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेला सुरुवात केली. त्यानंतर बक्षिस वितरणाचा सोहळा संपन्न झाला.
यावेळी युवासेना उप जिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे, ललित लांजेवार, मंगल भोंगळे, महेश पहापळे, असलम शेख, सचिन पचारे, नामदेवराव शेलवडे, राजु देवडे, प्रमोद मिलमिले, प्रा.मालेकर संतोष बेलेकर, जनार्दन थेटे, हितेश गोडे, राहुल झट्टे, सौरभ वानखेडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सागर जाधव यांनी केले तर आभार ललित लांजेवार यांनी मानले.
हे देखील वाचा: