मुलाचे हैवानी कृत्य… ब्राह्मणी परिसरात जन्मदात्या आईवर मुलाचा अत्याचार

मुलाच्या कृत्याने अस्वस्थ झालेल्या आईचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

0

जितेंद्र कोठारी, वणी: मुलानेच जन्मदात्या आईवर अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. नात्याला काळीमा फासणारी ही घटना तालुक्यातील ब्राह्मणी परिसरात घडली. या प्रकरणी आरोपी 27 वर्षीय नराधम विकृताला अटक करण्यात आली आहे.

नराधम मुलगा (27) हा आईसह ब्राह्मणी परिसरात राहतो. त्याचे लग्न झालेले नाही. तो नजिकच्याच एका कोल व्हॉशरीमध्ये काम करतो. त्याला दारूचे व्यसन असल्याची माहिती आहे. शुक्रवारी दिनांक 23 जुलै रोजी तो कामावरून घरी आला व झोपी गेला. दरम्यान घरी त्याची आई एकटीच झोपली होती. मध्यरात्री मुलाच्या मनात विकृती जागी झाली. त्याने आईसोबत बळजबरी करीत अत्याचार केला.

अस्वस्थ आईने केले विष प्राषण
जन्मदात्या मुलाकडून असे विकृत कृत्य झाल्याचे आईला सहन झाले नाही. घटनेच्या काही वेळेनंतर तिने विष प्राषण करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सकाळी आईला वणीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर ती बरी झाली. मात्र मुलाने केलेले हैवानी कृत्य काही तिच्या डोक्यातून जात नव्हते. अखेर तिने पोलिसांत तक्रार देण्याचा निश्चय केला.

पीडित आईने शुक्रवारी दिनांक 30 जुलै रोजी पोलीस स्टेशन गाठत ठाणेदारांना याबाबत माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नराधम मुलावर पीडित तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली असून त्याच्यावर भादंविच्या कलम 376 (2) (F) (A) 323, 506 नुसार गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास पीएसआय अरुण नाकतोडे करीत आहे.

हे देखील वाचा:

आता अवघ्या 1.5 हजारात कुंपन झटका मशिन

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये होलसेल दरात खरेदी करा फवारणी पम्प

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.