वीज कोसळून मृत्यू झालेल्या मृतकाच्या कुटुंबीयांना शासनाची मदत

कोलगाव येथे मृतकाच्या घरी जाऊन कुटुंबीयांना आमदारांच्या हस्ते धनादेश सुपुर्द

0

भास्कर राऊत, मारेगाव: कोलगाव येथील रहिवाशी असलेल्या इंदूबाई मारोती हिंगाने (48) यांचा अंगावर वीज कोसळल्याने मृत्यू झाला होता. या प्रकरणी मृतकाच्या कुटुंबीयांना शासनातर्फे आज मदत देण्यात आली. कोलगाव येथे मृतकाच्या घरी जाऊन शासनाचा 4 लाख रुपयांचा धनादेश आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते मृतकाच्या कुटुंबीयांकडे सुपुर्द करण्यात आला.

इंदुबाई मारोती हिंगाने (48) यांचे कोलगाव लगत असलेल्या वडगाव वाघाडी येथे शेत होते. दिनांक 19 जुलै रोजी त्या नेहमीप्रमाणे मुलासह शेतामध्ये निंदण करीत होत्या. संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास आकाशात एकाएकी ढग दाटून आले व इंदूबाईंच्या अंगावर वीज कोसळली. आईच्या अंगावर वीज कोसळल्याचे लक्षात येताच मुलगा धावत आला. त्यांना उपचारासाठी दाखल कऱण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.

या घटनेचा प्रशासनातर्फे पंचनामा करण्यात आला होता. नैसर्गिक आपत्तीने झालेल्या मृत्यूमुळे मृतकाच्या कुटुंबीयांना मदत म्हणून 4 लाख रुपयाचा धनादेश देण्यात आला. यावेळी आ. संजीवरेड्ड़ी बोद्कूरवार, दिपक पुंडे-तहसीलदार मारेगाव, संजय वानखेडे-गटविकास अधिकारी मारेगाव, आभिषा राजू नीमसटकर-सरपंच कोलगाव, सहारे मंडळ अधिकारी, खोब्रागडे-तलाठी, अरुण नीमसटकर-पोलिस पाटील,कोलगाव यांच्यासह शंकर लालसरे, प्रशांत नांदे, ज्ञानेश्वर चिकाटे, नामदेव जाधव, विश्वजित गारघाटे, राजू निमसटकर आणि गावकरी उपस्थीत होते.

हे देखील वाचा:

रामचंद्र खिरेकार ठरले जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट नायब तहसीलदार

वणी बसस्थानकावर 2 प्रवाशांना मारहाण करून लुटले

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.