प्लॉस्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तीवर बंदी घाला

वणी शहरातील व्यावसायिक मूर्तीकारांची मागणी

0

जब्बार चीनी, वणी: आगामी काळात श्री गणेश उत्सव सण मोठया प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. या सणानिमीत्त वणी शहरातील सर्व व्यावसायिक मूर्तीकारांनी पर्यावरण पुरक मातीच्या मूर्त्या बणविण्याचा एकमताने निर्णय घेतला आहे. परंतु काही व्यवसायिक लोक हे बाहेरून प्लॉस्टर ऑफ पॅरीसच्या श्री गणेशमूर्ती वणी शहरात आणुन त्यांची मोठ्याप्रमाणात विक्री करतात. त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होतो. त्यावर बंदी आणावी अशी मागणी मूर्तीकारांद्वारे करण्यात आली आहे.

वणी शहरात प्लॉस्टर ऑफ पॅरीसच्या मुर्तीला शासनाकडून बंदी असल्याने बाहेर गावावरुन वणी शहरात विक्री करीता मूर्त्या आणल्यास त्यांचेवर योग्य कारवाई करावी, अशी मागणी शहरातील सर्व मूर्तीकारांद्वारा करण्यात आली आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळे यांना निवेदन देण्यात आले आहे.

निवेदन देते वेळी मूर्तीकार सुधाकर बुरडकर, लहु दातारकर, नथ्थु डुकरे, सुभाष झिलपे, सुहास झिलपे इत्यादींची उपस्थिती होती.

हे देखील वाचा:

वणीतील पहिल्या फॅशन व इंटेरिअर इन्स्टिट्युटमध्ये प्रवेश सुरू

आज ‘होटल दावत’ फॅमिली रेस्टॉरन्टचे होणार उद्घाटन

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.