पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे यांना निरोप

खरबडा ग्रामपंचायत व सवारी मंडळाने केला सत्कार

0

सुशील ओझा, झरी: पाटण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे यांना सत्कार करून निरोप देण्यात आला. त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची पावती म्हणून खरबडा ग्रामपंचायत, ग्रामवासी व सवारी मंडळांनी सत्कार करत कृतज्ञता व्यक्त केली. पाटण पोलीस स्टेशनमध्ये अडीच वर्ष सेवा दिली. सध्या त्यांची बदली अमरावती येथे झाली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

खरबडा ग्रामपंचायत , ग्रामवासी व सवारी मंडळ तर्फे 22 ऑगस्ट रोजी गावात महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. खरबडा गावातील सवारी बंगल्यातून लाखो रूपयाचे साहित्य चोरी करण्यात आलेल्या तपासात चोराला अटक करून समोरण मुद्देमाल जप्त करून सर्व साहित्य सवारी मंडळाच्या स्वाधीन केले होते. त्यामुळे त्यांची खराबडा गावात त्यांची वेगळी प्रतिमा आहे.

पीएसआय मोरे यांनी आपल्या भाषणात गावकऱ्यांनी दिलेल्या प्रेमाचे वरून मी फेडू शकणार नाही माझ्यावर एवढे प्रेम करणाऱ्या ग्रामवासीयांना मी कधी च विसरणार नाही. असे मनोगत व्यक्त केले. सत्कार समारंभ कार्यक्रमात ग्रामवासी व पोलीस कर्मचा-यांची उपस्थिती होती. 

Leave A Reply

Your email address will not be published.