बुरांडा (गोंड) येथे अविवाहित तरुणाची आत्महत्या

चंद्रपूर येथे उपचार दरम्यान मृत्यू

0

भास्कर राऊत, मारेगाव: बुरांडा (गोंड) येथील एका पंचविस वर्षीय अविवाहित युवकाने ता. २० ऑगस्ट रोजी स्वतःच्या घरी विष प्राशन केले होते. दोन दिवस मृत्युसी झुंज देत अखेर चंद्रपुर येथे उपचारादरम्यान ता. २२ ऑगस्ट रोजी पहाटे त्याचा मृत्यु झाला. आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव प्रवीण श्रीराम शेंदरे आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

प्रवीणने ता.२० ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजेदरम्यान स्वतःच्या घरीच विष प्राशन केले होते. ही बाब लक्षात येताच त्याला मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने चंद्रपुर येथे हलविण्यात आले.

परंतु सलग दोन दिवस मृत्यसी झुंज दिल्यानंतर ता.२२ ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजेदरम्यान त्याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. वृत लिहीपर्यंत आत्महत्येचे कारण कळु शकले नव्हते. त्याचे पश्चात आई वडील व दोन भाऊ आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.