देशी कट्टा गृपतर्फे सतीशबाबू तोटावार यांना श्रद्धांजली
सदस्यांतर्फे देण्यात आला आठवणींना उजाळा
पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणीतील देशी कट्टा या मॉर्निंग वॉक गृपतर्फे शनिवारी सतीशबाबू तोटावार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सतीशबाबू हे या गृपचे सदस्य होते. आपला एक सहकारी एकाएकी काळाच्या पडद्याआड गेल्याने देशी कट्टा तर्फे श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ओम चचडा यांच्या अध्यक्षतेखाली श्रद्धांजली कार्यक्रम झाला. यावेळी गृपच्या सदस्यांनी आपल्या मनोगतातून सतीशबाबू यांच्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी राजाभाऊ पाथरडकर, गणेश गुप्ता, डॉ. प्रदीप ठाकरे, अरुण पटेल,रवि बेलूरकर, प्रमोद निकुरे,प्रमोद इंगोले,भास्कर गोरे,सचिन मते, विजय भाराणी, प्रमोद लोणारे,शरद मंथनवार, राजकुमार सागरे, अशोक पांडे, दिलीप लांजेवार, अनिल ठाकुरवार, सुरेश बन्सोड, भैय्या बदखल, वसंता महाकरकार, राजु शिरभाते, अजय कापसे इत्यादींची उपस्थिती होती.
वणी नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष व शहरातील प्रसिद्ध कोळसा व्यावसायिक सतिशबाबू तोटावार यांचे शुक्रवार 27 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 वाजता निधन झाले. ते 58 वर्षांचे होते. शहरात ते ‘जिजाजी’ नावाने सुपरिचित होते. 1996-97 या काळात त्यांनी वणी नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद भूषवले होते. त्यांना हृदयविकाराचा धक्का आला होता. त्यानंतर त्यांना नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र हृदयाच्या शस्त्रक्रियेनंतर ब्रेन हॅम्रेज होऊन ते कोमात गेले होते.
हे देखील वाचा:
Comments are closed.