पकड वारंट निघालेल्या विविध गुन्ह्यातील 17 आरोपींना अटक

न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना करणे भोवले

सुशील ओझा, झरी: न्यायालयात हजर राहण्याकरिता अनेकदा समन्स बजावूनही हजर न राहणा-या आरोपींवर न्यायालयाने बडगा उगारला आहे. मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या अनेक आरोपींविरोधात पकड वॉरंट जारी करण्यात आला असून 17 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. त्यामुळे तारीख देऊनही न्यायालयात हजर न राहणा-या आरोपींचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत मुकुटबन, दरा साखरा, मांगली, अर्धवन, गणेशपूर, बोपापूर, येसापूर, राजूर (गोटा) व कोसारा येथील लखन कडू, अनिल खडसे, नामदेव मडावी, विनोद घोडाम, अनिल नवघरे, दत्ता जुमनाके, बंडू निखाडे, शेख खय्याम सैय्यद गफार, किशोर जिंनावार, नारायण म्याकलवार, विठ्ठल चामाटे, ओमप्रकाश कोडापे, अजय मडावी असे आरोपींचे नावे आहेत. वरील आरोपी कोंबड बाजार, वाहन चोरी, मारहाण व इतर फौजदारी गुन्ह्यातील आरोपी आहे. वारंवार समन्स बजाऊनही हे आरोपी न्याायालयात हजर राहत नव्हते.

अखेर न्यायालयाने वरील सर्व आरोपींविरोधात अजामिनपात्र अटक वॉरंट जारी केला होता. पकड वॉरंट निघताच मुकुटबन पोलिसांनी आरोपींना अटक करण्याचा सपाटा लावत 17 आरोपींना अटक करून न्यायालययात हजर केले. यातील काही आरोपींना न्यायालयाने दंड ठोठावला आहे तर काहींची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

ठाणेदार अजित जाधव यांनी वॉरंटचे आरोपी पकडण्याकरिता एक टीम तयार केली असून ही टीम आठवड्यातून एकदा गावात फिरून वॉरंट निघालेल्या आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करणार आहे. सदर कारवाई ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार शशिकांत नागरगोजे, अशोक नैताम, मोहन कुडमेथे,प्रवीण तालकोकुलवार, रंजना सोयाम व नईम शेख यांनी केली.

हे देखील वाचा:

गणेशोत्सव ऑफर: सोलर झटका मशिनवर तुर कटर, डॉग हॉर्न, टॉर्च मोफत

लग्न होत नसल्यामुळे चिडवल्याने दोन मित्रांमध्ये वाद

अखेर वणी नगरपाकिलेकाला मिळाले मुख्याधिकारी

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.