लग्नाचे आमिष दाखवीत तरुणीवर लैंगिक अत्याचार

तालुक्यातील सोनू पोड येथील घटना, वारंवार घडणाऱ्या बलात्काराच्या घटनांनी तालुक्यात खळबळ

भास्कर राऊत, मारेगाव: लग्नाचे आमिष दाखवून एका युवतीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना तालुक्यातील सोनू पोड येथे घडली आहे. वारंवार अत्याचार केल्यानंतरही लग्नास नकार देणाऱ्या युवकाविरुद्ध मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Podar School 2025

सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील सोनू पोड येथे राहणाऱ्या एका 20 वर्षीय युवतीचे तालुक्यातीलच जळका पोड येथे राहणाऱ्या दिनेश माणिक गजरे वय 24 याच्याशी संबंध जुळले. जळका येथे पीडितेची मावशी राहते. मावशीच्याच नात्यातील असलेल्या दिनेशशी पीडितेची तीन वर्षांपूर्वी ओळख झाली. या ओळखीचे नंतर दोन वर्षांपूर्वी कधी प्रेमात रूपांतर झाले हे त्यांना कळलेच नाही.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

दि. 4 जून 2020 ला वाढदिवसाच्या निमित्ताने दिनेश गजरे याने या युवतीला शुभेच्छा देण्यासाठी बोटोनी येथे बोलाविले. रात्री अंदाजे 9.30 च्या दरम्यान शुभेच्छा दिल्यानंतर माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे व मी लवकरच तुझ्याशी लग्न करणार असे लग्नाचे आमिष दाखवून दिनेशने बाजूच्याच जंगलात नेऊन अत्याचार केला. तसेच नंतर वर्षभर लग्नाचे स्वप्न दाखवत वारंवार अत्याचार केला.

दि. 14 सप्टेंबरला रात्री 9.30 ला दिनेशने अशाच प्रकारे फोन करून बोलावले. पीडिता रात्री 10 वाजता सोनू पोड येथील बसस्टॉपवर दिनेशला भेटायला गेली. त्यावेळीही त्याने शरीर सुखाची मागणी केली. पीडितेने नकार दिल्यानंतर तिला बाजूच्या शेतात नेऊन जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केला. व दोघेही बोटोनीला आले. त्यावेळी पीडितेने लग्नाविषयी विचारणा केली असता मी तुझ्यासोबत लग्न करत नाही . तुला काय करायचे ते कर, असे म्हणून निघून गेला. त्यानंतर पीडितेने बोटोनी येथील मावशीकडे जात घडलेली आपबीती सांगितली.

यावरून पीडितेच्या मावशीने पीडितेच्या वडिलांना फोनवरून घडलेली घटना सांगितली. आणि दि. 15 सप्टेंबरला वडिलांसोबत येऊन पीडितेने मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून मारेगाव पोलिसांनी तात्काळ आरोपीला कलम 376, 376 (2)(जे)(एन) नुसार अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार करीत आहेत.

हे देखील वाचा:

 

Comments are closed.