खुशखबर… वणीत दोन दिवशीय सिनेमॅटोग्राफी प्रशिक्षण शिबिर

कॅमेरा शिकण्याची सुवर्णसंधी, बना प्रोफेशनल व्हिडीओग्राफर

सुरेश पाचभाई: वणीत दोन दिवशीय सिनेमॅटोग्राफी/व्हिडीओग्राफी वर्कशॉप आयोजित करण्यात आले आहे. सदर वर्कशॉप हे 24 व 25 सप्टेंबर रोजी बाजोरीया लॉन येथे होणार आहे. नाशिक येथील सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर व ट्रेनर अमोल व राहूल पाटील हे या शिबिरात प्रशिक्षण देणार आहे. ते या शिबिरात कॅमे-याचे तंत्र आणि मंत्र देणार आहे. विशेष म्हणजे या वर्कशॉपमध्ये लाईव्ह वेडिंग डेमो देखील दिला जाणार आहे. कॅमेरा, फोटोग्राफीचा छंद असणारे, महिला, विद्यार्थी तसेच प्रोफेशनल फोटोग्राफर/ व्हि़डीओग्राफरसह या क्षेत्रात करीअर करू इच्छिणारे सहभागी होऊ शकतात. बाहेरगावाहून येणा-या विद्यार्थ्यांसाठी राहण्याची व्यवस्था देखील आयोजकांतर्फे करण्यात आली आहे. गेल्या 21 वर्षांपासून व्हिडीओ एडिटिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या साई व्हिडीओ व्हिजन द्वारा या वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे.

अनेकांकडे व्हिडीओ अथवा फोटोग्राफीसाठी कॅमेरा असतो. मात्र शुटिंगचे तंत्र माहिती नसल्याने प्रोफेशनल पद्धतीने शुटिंग करता येत नाही. सध्या काळानुसार शुटिंगची बरीच पद्धत बदलली आहे. ही बाब लक्षात घेऊन या शिबिरात प्रोफेशनल पद्धतीने मार्गदर्शन केले जाणार आहे. याचा कॅमेरा, शुटिंगचा छंद असणा-यांना तसेच प्रोफेशनल फोटोग्राफर/ व्हि़डीओग्राफरला निश्चित फायदा होऊ शकतो.

काय शिकवले जाणार?
या शिबिरात विविध कॅमे-याची सेटिंग, विविध कॅमेरा ऍन्गल, स्लिक ऍन्गल काय आहे? लेन्सचे प्रकार, पिक्चर प्रोफाईल, लेन्सचे मार्गदर्शन, लाईटचा उपयोग करा करायचा, कम्पोझिशन आणि फ्रेमिंग, सिनेमॅटिक लाईट काय आहे, लो लाईट शुटिंग कशी करावी, ट्रायपॉड, गिंबलचा उपयोग कसा करावा, कॅमेरा एक्सपोझर, कपल शुट कसे करावे? इत्यादी बाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच दुसरा दिवस लाईव्ह दिवशी लाईव्ह डेमोसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. यात हळद, वरमाला, सप्तपदी, बारात इत्यादींच्या शुटिंगचे लाईव्ह डेमॉस्ट्रेशन दिले जाणार आहे.

या शिबिरात व्हि़डीओग्राफीचा छंद असलेली व्यक्ती, व्हिडीओग्राफी क्षेत्रात येऊ इच्छिणारी व्यक्ती, कॉलेजचे विद्यार्थी, महिला तसेच प्रोफेशनल व्हिडीओग्राफर व फोटोग्राफर सहभागी होऊ शकतात. या वर्कशॉपसाठी 3495 रुपये फिस आकारली जाणार आहे. तर बाहेरगावाहून येऊन स्टे करणा-या विद्यार्थ्यांसाठी 3995 रुपये फिस आकारली जाणार आहे. फिसमध्ये लंच तसेच बाहेरगावाहून येणा-या विद्यार्थ्यांसाठी निवासी व्यवस्था व ब्रेकफास्टची व्यवस्था करण्यात येणार आहे.

अशी संधी पुन्हा येणे नाही – प्रशांत झाडे
टेक्नॉलॉजी आणि लोकांच्या आवडीनिवडीत अनेक बदल झाल्याने सध्या व्हिडीओग्राफीचे तंत्र काही प्रमाणात बदलले आहे. तसेच येणारा काळ हा सिनेमॅटिक व्हिडीओचा आहे. त्याला अनुसरून प्रत्येकाने आपल्या कार्यक्षेत्रात अपडेट असणे गरजेचे आहे. वणीत असे वर्कशॉप व्हावे अशी इच्छा अनेकांनी बोलून दाखवली होती. त्यामुळे या शिबिरची आम्ही पुढाकार घेतला. अशा पद्धतीचे दोन दिवशीय व्हिडीओग्राफी/सिनेमॅटोग्राफी वर्कशॉप पहिल्यांदाच आपल्या शहरात होणार आहे. सिनेमॅटोग्राफी व वेडिंग सिनेमॅटोग्राफीमध्ये प्रसिद्ध असलेले नाशिक येथील अमोल पाटील व राहुल पाटील यांच्याकडून शिकणे ही एक वणी आणि परिसरातील इच्छुकांसाठी एक सुवर्णसंधीच आहे. अशी संधी पुढे पुन्हा येणे अशक्य असल्याने परिसरातील अधिकाधिक हौशी, व्हिडीओग्राफी, सिनेमॅटोग्राफी प्रेमींनी याचा अवश्य लाभ घ्यावा.
– प्रशांत झाडे, संचालक साई व्हिडीओ व्हिजन

अधिक माहितीसाठी व ऑनलाई रजिस्ट्रेशनसाठी संपर्क –
प्रशांत झाडे – 9881334816
पंकज झाडे – 9028425942

हे देखील वाचा:

वणीत होणार पहिल्यांदाच स्टॉक मार्केट प्रशिक्षण शिबिर

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.