महसूल कर्मचा-यांचे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

आर्णी येथील तलाठ्याच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी

भास्कर राऊत, मारेगाव: शेतकऱ्यांच्या पिकाच्या ई-पीक प्रकल्पाच्या अंमलबजावणी साठी वरिष्ठ अधिका-यांनी दबाव टाकल्याने तणावात येऊन आर्णी येथील तलाठ्यांचा अपघाती मृत्यू झाला असा आरोप करत या निषेधार्थ तालुक्यातील तलाठ्यांनी तहसील कार्यालया समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करून निषेध नोंदवला. यावेळी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

या वर्षीपासून राज्य शासनाने ई-पीक पाहणी अहवालाची जबाबदारी शेतकऱ्यांवर सोपविली असून याच्या प्रसिद्धीची जबाबदारी तलाठी यांच्या सोबतच इतर विभागावर सोपविण्यात आली आहे. वरीष्ठ अधिकारी तालाठ्यांना ई-पीक पाहणीच्या अहवालाबाबत वारंवार माहिती विचारल्यानेच तणावात येऊन आर्णी तालुक्यातील तलाठी अजय पस्तापुरे यांचा अपघाती मृत्यू झाला असल्याचा आरोप पटवारी संघाने केला आहे.

या घटनेच्या निषेधार्थ व दोषींवर कारवाईच्या मागणी साठी विदर्भ पटवारी संघ नागपुर तालुका शाखा मारेगावच्या वतीने स्थानिक तहसील कार्यालया समोर आज मंगळवारी दिनांक 21 सप्टेंबर रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी विदर्भ पटवारी संघाचे एस. एन. सुर्वे, डी. के. जाधव, राजू श्रीपदवार, एम. डी. चिकणकर, व्ही.एच. थिटे, आर.एस. वराकर, डी. पी.वानखडे, व्ही.एम. जिवतोडे, जे.एस. कनाके, एल. डी. कुळसंगे, यु.व्ही.घोटकर, आर.डी. डवरे, ए. बी.पिंपळकर, एम. जी.बोपचे, आर.डी. कोडरकर, पी.आर.उपाध्याय, व्ही.बी.सोयाम, व्ही.आर.उमाटे, व्ही.जे.मडावी,एस. बी.राठोड, आर.एस. शिंगणे, व्ही.एल. गोरे आदी तलाठ्यांसह मंडळ अधिकारी तथा कोतवाल संघटनेचे जिल्हाध्यक्ष शशीकांत निमसटकर, सचिव अतुल बोबडे उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.