तालुका प्रतिनिधी, वणी: स्वातंत्र्यदिना निमित्ताने ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत नेहरू युवा केंद्र यवतमाळ, युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय भारत सरकार द्वारा जिल्हा युवा अधिकारी सारंग मेश्राम, नेहरू युवा केंद्राचे अनिल ढेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, नेहरू युवा केंद्राची राष्ट्रीय स्वयंसेविका दामिनी मडावी हिच्या पुढाकाराने आदर्श हायस्कूल शिंदोला येथे शनिवारी सकाळी ‘फिट फॉर रन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
धावपळीच्या जीवनात अनेकांचे व्यायामाकडे दुर्लक्ष होत असते. त्यामुळे लहान- थोरांना शारीरिक व्याधींचा सामना करावा लागतो. परिणामी आरोग्य राखण्यासाठी खर्चात वाढ होते. त्यासाठी दैनंदिन जीवनात व्यायाम करणे आवश्यक आहे. म्हणून युवकांना व्यायामाचा संदेश देण्याच्या उद्देशाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन मुखाध्यापक पुरुषोत्तम घाटे यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी पंचायत समितीचे सदस्य संजय निखाडे, सरपंच विठ्ठल बोंडे, उपसरपंच किशोर किनाके उपस्थित होते. शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे कार्यक्रमात सहभाग घेतला. स्पर्धेच्या सुरुवातीला ‘फिट फॉर रन’ची शपथ घेण्यात आली. यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि गावातील युवकांनी सहकार्य केले.
हे देखील वाचा:
Comments are closed.