चिंचमंडळ येथे बैलाचा सर्पदंशाने मृत्यू

अल्पभूधारक शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील चिंचमंडळ येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या बैलास सर्पदंश झाल्याने बैलाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत किमान 70 ते 80 हजार रुपयांचे नुकसान झाल्याने या शेतकऱ्यांसमोर एक नवे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. प्रशासनाने पंचनामा करून आर्थिक मदत करावी अशी मागणी पिडीत शेतकऱ्याने केली आहे.

चिंचमंडळ येथील विनायक पुरुषोत्तम भोयर अल्पभूधारक शेतकरी रविवारी सायंकाळी पाच वाजताचे सुमारास स्वतःची बैलजोडी शेतात चारत असतांना त्यापैकी एका बैलास पायाला सर्पदंश झाला. शेतकऱ्याने त्वरित बैल घरी आणला परंतु उपचारास विलंब झाल्याने त्या बैलाचा रात्रीच्या सुमारास मृत्यू झाला.

मार्डी येथे अ श्रेणीचे पशुचिकित्सालय असताना सुद्धा योग्य वेळात उपचार न मिळू शकल्याने या शेतकऱ्यास आपला बैल गमवावा लागला शेतकऱ्यास जवळपास 70000 रुपयाचे नुकसान झाले आहे. दरम्यान प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून आर्थिक मदत करावी अशी मागणी पिडीत शेतकऱ्याने केली आहे.अलीकडेच निसर्गाच्या बेतालाने मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे ठाकले आहे.

मालगाडीच्या धडकेने वृद्ध महिला जागीच ठार

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.