मारेगाव तालुक्यात विजेचा रेकॉर्ड ब्रेक लपंडाव

दर 10 ते 15 मिनिटानंतर वीज गुल, अधिकारी नॉट रीचेबल

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव तालुक्यात आज रविवारी दि 3 ऑक्टोबरला दिवसभर विजेचा रेकॉर्डब्रेक लपंडाव दिसून आला. 10 मिनिटे राहिलेली वीज केव्हा गायब होईल याचा भरोसाच नव्हता. वीज आली आली म्हटले की लगेच गायब होऊन जायची. आज दिवसभरात 20-25 वेळा वीज गेल्याचे नागरिक सांगत आहे. अख्खा दिवस आज विजेविना गेला असून याविषयी विचारणा करावे म्हटले तर कोणी नॉट रीचेबल, कोणी स्विच ऑफ, तर कोणी साधे फोनही उचलायला तयार नसल्याची परिस्थिती मारेगाव वीज मंडळाची दिसून आली. असून याविषयी सामान्य जनतेमधून मात्र रोष व्यक्त केला जात आहेत.

आजचा रविवार तसा हिटवारच ठरला. तीन दिवसांपासून पावसाने उघाड दिल्याने उन्हेने जोर पकडला होता. उष्णतेमुळे दिवसभर उकळत होते. त्यामुळे यहोद हवेचा आसरा घेण्यासाठी पंखा किंवा कुलरसमोर बसावे तर विजेचा लपंडाव. आज दिवसभर वीज ही कॉरनटाईन असल्यासारखी होती. केव्हा यायची आणि केव्हा जायची याचा थांगपत्ताही लागायचा नाही. नेमकी विजेची समस्या कोणती याविषयी संबंधित अधिकारी वा विभाग यांना माहिती विचारावे तर कोणी स्विच ऑफ, कोणी नॉट रीचेबल तर कोणी साधे फोनही उचलत नाही.

सामान्य जनता तर या अधिकारी व कर्मचारी यांच्यामुळे त्रासलेली दिसते. बरे, दिवसभर वीज नसतांनाही रात्री तरी नीट मिळावी अशी अपेक्षा असलेल्या ग्रामीण भागात तर या समस्येविषयी न विचारलेलेच बरे. शहरी भागात अशी अवस्था असेल तर ग्रामीण भागातील जनतेचे यापेक्षाही भयानक हाल या वीज नसल्याने होत असतांनाही बिल मात्र भरमसाठच येत असते.

आज दि. 3 ऑक्टोबरला दिवसभरातून कमीतकमी 20 ते 25 वेला वीज गेल्याचे शहरातील नागरिक सांगत आहेत. सध्या गणपती, त्यानंतर देवीचा महोत्सव असल्याने विजेची ही समस्या काय रूप घेईल हे सांगता येत नाही. विजेची अशीच अवस्था राहिल्यास जनतेच्या अक्रोशाला वीज वितरणच्या अधिकारी कर्मचारी यांना सामोरे जावे लागल्याशिवाय राहणार नाही.

हे देखील वाचा:

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला नेले पळवून

क्रिकेटवर बेटिंग करताना नायगाव (खु) येथून एकाला अटक

Comments are closed.