रवि ढुमणे, वणी: महिलेचे लैंगिक शोषण करून तिचा व्हिडीओ काढून ब्लॅकमेलिंक करणा-या एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याच्या नुकत्याच पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. एका 33 वर्षीय महिलेने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. मात्र सदर व्हिडीओ तयार करणारा कोण ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. सध्या या प्रकरणाबाबत शहरात एक वेगळीच चर्चा सुरू आहे. या प्रकरणात जिल्हा परिषदेच्या अधिनस्त असलेल्या कार्यालयातील बडे अधिकारी तसेच राजकारणातील एक ‘सदस्य’ सामील असल्याच्या खमंग चर्चेला उत आलं आहे.
अटक करण्यात आलेला भास्कर गोरे हा कंत्राटदार म्हणून काम करतो. तो पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील बांधकामाचे कंत्राट घेतो. परिणामी त्याची अनेक कामांची देयके पंचायत समिती स्तरावर अडकलेली असल्याची चर्चा आहे. देयके मिळत नसल्यास अधिकाऱ्यांची खातरजमा करणे, त्यांना विविध आमिष दाखवणे असे अनेक प्रकार येथे चालत असतात. त्यामुळे कदाचित असाच प्रकार झाल्याची चर्चेला सध्या वणीत चांगलच उधाण आलंय.
संबंधित महिलेचे शोषण करून तिला दुचाकीवर बसवून कित्येकदा बाहेर घेऊन गेल्याचे प्रसंग बघायला मिळाले. परंतु जेव्हा इच्छेविरुद्ध अत्याचार करण्यात आला त्यावेळी व्हिडीओ कोण काढत होता असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे. पीडित महिलेला एका घरात नेऊन तिची चित्रफित तयार करीत वारंवार पैशाची मागणी करीत असल्याचे आरोप पीडितेने केले आहे.
या प्रकरणात काही पंचायत समिती मधील अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे. आता ते अधिकारी आणि पदाधिकारी कोण ? असा प्रश्न सर्वांना भेडसावतोय. एकूणच या प्रकारात अनेक लोक सामील असण्याची शक्यता बळावली आहे. पीडितेची चौकशी करून या घटनेचा तपास महिला पोलीस अधिकारी यांनी सुरू केला आहे. आता या प्रकरणात कोण कोण सहभागी आहेत हे तपासात समोर येईलच…
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Prev Post