आजारपणाला कंटाळून विवाहित तरुणाची आत्महत्या

मारेगाव तालुक्यातील भुरकी (पोड) येथील घटना

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील भुरकी पोड (खंडणी) येथे एका विवाहित युवकाने आत्महत्या केली असून तालुका पुन्हा आत्महत्येच्या घटनेने हादरून गेलेला आहे.

भुरकी पोड येथील हरिदास वसंता रामपूरे (35) या इसमाने खंडणी व भुरकी पोड शिवाराच्या मध्ये पळसाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दि.१७ नोव्हेंबर बुधवार रोजी सकाळी ७:३०वाजताच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली आहे.

याबाबतची माहिती पोलीस पाटील यांनी मारेगाव पोलीस ठाण्याला दिली. हरिदास रामपुरे हे तालुक्यातील गोंड बुरांडा येथील रहिवासी होते. ते कामानिमित्त आपली सासुरवाडी असलेल्या भुरकी पोड येथे सध्या वास्तव्य करीत होते. हरिदास वसंता रामपुरे हे पोटाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांना पोटाचा कॅन्सर झाला होता व त्याचे सावंगी मेघे येथे ऑपरेशन सुद्धा झालेले होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

त्यांना त्रास होत असल्याने आत्महत्या केली असल्याचा अंदाज नातवाईकांनी यावेळी केला आहे. याबाबतची माहिती मिळताच मारेगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची पाहणी केली. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हरिदास यांच्या पश्चात पत्नी, 3 मुली 1 मुलगा असा आप्त परिवार आहे.

हे देखील वाचा :

मोठी कारवाई: कत्तलीसाठी जाणा-या 14 गोवंशांची सुटका

Comments are closed.