मुकुटबन येथील कंपनीच्या कार्यालयात कर्मचा-याचा मृत्यू

संतप्त झालेल्या नातेवाईकांची ग्रामीण रुग्णालयात गर्दी

विवेक तोटेवार, वणी: मुकुटबन येथील एक सिमेंट कंपनीत काम करणारा एक कर्मचारी चक्कर येऊन खाली पडला. त्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. आज सकाळी ही घटना घडली. दरम्यान संतप्त झालेल्या मृतकाच्या नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात गर्दी करत कंपनीकडे आर्थिक मोबदला देण्याची मागणी केली आहे. 

सविस्तर वृत्त असे की राजू विठ्ठल बरपटवार (28) हा गाडेघाट ता. झरी येथील रहिवाशी होता. तो मुकुटबन येथील सिमेंट कारखान्यात केएसी नामक कंपनीमार्फत कामाला होता. तो 4 वर्षांपासून ऑफिस बॉय म्हणून नोकरी करायचा. आज सकाळी 8 नेहमी प्रमाणे राजू कार्यालयात कर्तव्यासाठी पोहोचला. मात्र काही वेळाने तो चक्कर येऊन खाली पडला. यात त्याच्या डोक्याला दुखापत झाली. त्यामुळे कार्यालयातील कर्मचा-यांनी त्याला कंपनीच्या रुग्णवाहिकेतून मुकुटबन येथील रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला वणी येथे नेण्याचा सल्ला दिला. वणी येथील ग्रामीण रुग्णालयात राजूला आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले

मृतकाचे नातेवाईक संतप्त
राजूच्या मृत्यूची बातमी मिळताच त्याचे नातेवाईक वणीतील ग्रामीण रुग्णालयात गोळा झाले. राजूचा कार्यालयीन कामादरम्यान मृत्यू झाल्याने याबाबत मोबदला द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. मोबदला न मिळाल्यास मृतदेह उचलणार नाही अशीही भूमिका त्याच्या नातेवाईकांनी घेतली आहे. दरम्यान वणी येथे कंपनीतील कुणीही पोहोचले नसल्याचा आरोप मृतकाच्या नातेवाईकांनी केला आहे.

हे देखील वाचा:

वेकोलि कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

जय महाकाली संघ ठरला WPL चा विजेता

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.