भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव बसस्टॉप पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या करणवाडी पेट्रोलपम्पाजवळ एक ऑटो पलटी झाला. या अपघातात 3 जण जखमी झाले आहे. यातील दोघांची परिस्थिती गंभीर असल्याची माहिती आहे. सदर अपघात हा आज संध्याकाळी पावने 7 वाजताच्या दरम्यान झाला. विशेष म्हणजे पलटी झालेला ऑटो हा विना नंबर असून ऑटोचालक अपघात होताच घटनास्थळावरून पसार झाला आहे.
सविस्तर वृत्त असे की एक विना नंबरचा ऑटो मारेगाव येथून 10 ते 12 प्रवासी घेऊन संध्याकाळी रोहपट व भुरकी पोड (खंडणी) येथील प्रवासी घेऊन जात होता. संध्याकाळी 6.45 वाजताच्या सुमारास करणवाडी पेट्रोल पम्पजवळ चालकाचे ऑटोवरील नियंत्रण सुटले व ऑटो पलटी झाला. ऑटो वेगात असल्याने पलटी होऊन काही अंतर घासत गेला. ऑटोतील शंकर लेतू टेकाम वय ४० वर्ष, राजू सुधाकर टेकाम वय १८ वर्ष दोघेही राहणार भुरकी पोड (खंडणी) हे गंभीर जखमी झाले तर कु किरण देवाजी टेकाम वय १० वर्ष रा. भुरकी पोड ही मुलगी किरकोळ जखमी झाली आहे. सर्व रुग्णावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.
ऑटो पलटी होताच ऑटोचालक घटनास्थळावरून ऑटो घटनास्थळी ठेऊन पसार झाला. घटनास्थळावर असलेल्या व्यक्तींनी अपघाताची माहिती मारेगाव पोलिसांना दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचली असून वृत्त लिहे पर्यंत घटनेचा पंचनामा सुरू होता. सदर ऑ़टोवर कोणताही क्रमांक नसून सदर ऑटो हा आरटीओ पासिंग नसलेला ऑटो असल्याची माहिती मारेगाव पोलिसांनी दिली आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.