अज्ञात जनावराने वाडग्यात येऊन पाडला बकरीचा फडशा

सोनेगाव येथील घटना, गेल्या आठवड्यात वाघाच्या हल्ल्यात 4 गायी ठार

दिलीप काकडे, घोन्सा: घोन्सा जवळील सोनेगाव येथील पशूपालक आशिष जिवने यांच्या मालकिची बकरीचा अज्ञात जनावराने फडशा पाडला. विशेष म्हणजे वाडग्यात (बकरीचे राहण्याचे ठिकाण) जनावराने प्रवेश करून बकरी फस्त केली. आज सकाळी ही घटना उघडकीस आली आहे.

सविस्तर वृत्त असे की आशिष जिवने यांच्या मालकीच्या बक-या दिवसभराच्या चराई नंतर वाडग्यात बांधून ठेवल्या होत्या. सकाळी ते वाडगा स्वच्छ करण्यासाठी गेले असता तिथे त्यांना एका बकरी मृत अवस्थेत व अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत दिसली. सदर बकरीवर जनावराने हल्ला केल्याचे त्यांना आढळले.

सोनेगाव परिसरात वाघाची दहशत
गेल्या आठवड्यात सोनेगावालगतच वाघाने चार गायी मारल्या होत्या. त्यामुळे ही बकरी वाघाने तर मारली नाही अशीही शंका गावात व्यक्त केली जात आहे. जर वाघाने मारली असेल तर वाघ आता गावातही शिरकाव करत असण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे बकरीवर हल्ला करणारे अज्ञात जनावर लांडगा आहे की वाघ याचा वनविभागाने शोध घेणे गरजेचे आहे.

हे देखील वाचा:

भरधाव ऑटो पलटी, 3 जखमी, दोघांची प्रकृती गंभीर

रानडुकराच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.