सिमेन्ट कंपनीत कोरोना गाईडलाईनला केराची टोपली

वासुदेव विधाते यांचे तहसीलदारांना निवेदन

जितेंद्र कोठारी, वणी: मुकुटबन येथील निर्माणाधिन आरसीसीपीएल सिमेंट कंपनीत परराज्यातील हजारो कामगार कामावर आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशीत केलेल्या कोरोना गाईडलाईनचे पालन सिमेंट कंपनीतर्फे केले जात नसल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ता वासुदेव विधाते यांनी केली आहे. तहसीलदार झरीजामणी यांना दिलेल्या निवेदनात विधाते यांनी कामगारांचे मुक्त संचारमुळे परिसरात कोरोना प्रसार होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

Podar School 2025

परराज्यातून प्रवास करून आलेली व्यक्तींना कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे. तसेच कोविड लसीचे दोन्ही डोज घेतलेल्या कामगारांनाच कामाच्या ठिकाणी काम करण्याची परवानगी आहे. परंतु सदर सिमेंट कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना कोविड लस घेतली का नाही याची शहानिशा केली जात नाही.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मुकुटबन येथे सोमवारच्या दिवशी आठवडी बाजार भरतो. त्यादिवशी कंपनीत काम करणारे कामगार भाजीपाला व इतर दैनंदिन वस्तू खरेदीसाठी बाजारात येतात. त्याच दिवशी आजूबाजूच्या शेकडो गावातील नागरिकही खरेदी व कामानिमित्त मुकुटबन बाजारात येत असते.

सिमेंट कंपनीतील एखाद्या कामगार कोरोना किंवा ओमायक्रोन बाधित असल्यास तालुक्यातील इतर लोकांनासुद्दा लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिमेंट कंपनीत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी तात्काळ कारवाई करण्याची मागणी वासुदेव विधाते यांनी केली आहे.

हे देखील वाचा:

Comments are closed.