मनिष बतरा यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

व्यापारी वर्गात मनिष बतरा यांचा मोठा प्रभाव

जितेंद्र कोठारी, वणी: व्यापारी वर्गात प्रभाव असलेले राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष मनिष बतरा यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. संजय देरकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मनिष बतरा यांनी शिवबंधन बांधून अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश घेतला. यावेळी शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख दीपक कोकास, शहर प्रमुख राजू तुरानकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

Podar School 2025

मनिष बतरा हे शहरातील सुपरिचित व्यावसायिक असून व्यापारी वर्गात त्यांचा चांगला प्रभाव आहे. याशिवाय त्यांच्या सामाजिक कार्यामुळे त्यांचा सर्वसामान्यांतही चांगला प्रभाव आहे. त्यांच्या या प्रवेशाने शिवसेना पक्ष संघटनेला नक्कीच फायदा होणार आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

यावेळी शिवसेना प्रणित भारतीय कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अविनाश भुजबळ, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे, युवा सेनेचे माजी शहराध्यक्ष ललित लांजेवार, शिवसेनेचे माजी शहर संघटक महेश पहापळे, विभाग प्रमुख मंगल भोंगळे, शाखाप्रमुख जनार्दन थेटे,प्रवीण खानझोडे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

हे देखील वाचा:

मारेगाव नगरपंचायत निकाल: काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष, मनसेची मुसंडी

Comments are closed.