विवेक तोटेवार, वणी: विठ्ठलवाडी परिसरात चोरट्यांनी घरफोडी करत नगदी व चांदीचे दागिन्यांवर डल्ला मारला. सुमारे 16 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. ही घरफोडी 1 मार्च ते 3 मार्च दरम्यान झाली. घरमालक महाशिवरात्रीसाठी बाहेरगावी गेले असता चोरट्यांनी घरफोडी करून हात साफ केला. घर मालकाच्या तक्रारीवरून वणी पोलिसात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील दत्त मंदिर मागे विठ्ठलवाडी परिसरात कुंतलेश्वर तुडविले राहतात. 1 मार्च रोजी ते महाशिवरात्री करिता जळका येथे आईच्या घरी गेले होते. दोन दिवस ते तिथे मुक्कामी होते. 3 मार्च रोजी दुपारच्या सुमारास त्यांच्या शेजा-यांना घराचे दार उघडे दिसले. त्यांनी तातडीने घरमालकाला फोन करून याबाबत विचारणा केली असता त्यांनी घरी कुणीच नसल्याचे सांगितले.
त्यामुळे कुंतलेश्वर यांना घरी चोरी झाल्याची शंका आली. ते त्वरित वणीला निघाले व 1.30 वाजता वणीला पोहचले. घरी बघितले असता घराचा कोंडा तुटलेला होता. आत प्रवेश करून बघितले असता कपाटातून 12 हजार 800 रुपये नगदी व चांदीच्या वस्तू असा एकूण 16 हजार 360 रुपयांचा मुद्देमाल चोरी झाल्याचे लक्षात आले.
कुंतलेश्वर यांनी वणी पोलिसात याबाबत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसात कलम 380, 457 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास विठ्ठल बुर्रेवार करीत आहे. कुतलेश्वर तुरुविले हे शहरातील सुपरिचीत इंग्रजीचे शिक्षक आहेत. ते खासगी शिकवणी घेतात.
हे देखील वाचा:
Comments are closed.