माऊली ग्रुपतर्फे पारायण व महाप्रसादचे आयोजन

जिजाऊनगर येथील गजानन महाराज मंदिरात 200 महिलांनी केले पारायण

जितेंद्र कोठारी, वणी: गुडीपाडव्याच्या निमित्याने नववर्षाचे स्वागत माऊलीच्या नामस्मरण व भक्तिभावाने साजरा करण्यासाठी श्री माऊली ग्रुपतर्फे छोट्या पोथीचे पारायण सोहळा आयोजित करण्यात आला. जिजाऊ नगर येथील गजानन महाराज मंदिरात आयोजित या कार्यक्रमात सकाळी 9 ते 10.30 वाजेपर्यंत पारायण, 10.30 ते 11.00 उपासना व 12.00 वाजता महाआरतीनंतर महाप्रसाद वितरण करण्यात आले. यावेळी तब्बल 200 महिलांनी सामूहिक पोथीचे वाचन केले. पारायण कार्यक्रमात मुन्ना महाराज तुगनायत, गोपाल मल्लूरवारसह माऊली ग्रुपच्या ॲड. पौर्णिमा शिरभाते, शालिनी रासेकर, विजया आगबत्तलवार ,ज्योत्स्ना आचार्य, गीतांजली एकरे, वंदना धगडी, मंगला झिलपे, मंदा बांगडे, सविता ठेपाले, सुरेखा वडीचार ह्या महिला उपस्थित होत्या.

Comments are closed.