मारेगाव जवळ धावता ऑटो खाईत पलटी

लहान बाळासह 4 जण जखमी, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू तर चालक गंभीर

भास्कर राऊत मारेगाव: तीनचाकी प्रवासी ऑटो तब्बल 20 फूट खोल खाईत पलटी होऊन ऑटोचालक व लहान मुलासह 4 जण जखमी झाले. मारेगाव पासून काही अंतरावर खडकी (बुरांडा) जवळ ही घटना आज बुधवार 26 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता सुमारास घडली. या दुर्घटनेत 2 जण गंभीर जखमी झाले तर दोघांना किरकोळ इजा झाली. गंभीर जखमी पैकी एकाचा वणी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे

Podar School 2025

प्राप्त माहितीनुसार वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील मधुकर लसवंते हे आपल्या नातेवाईकांसोबत खासगी आटो क्र. (MH29 AM0878) ने मारेगाव येथून घोगूलधरा लग्नासाठी निघाले होते. यावेळी ऑटोमध्ये चालकासह 6 प्रवासी होते. मारेगाव पासून 4 कि.मी. अंतरावरील खडकीजवळ भरधाव ऑटोवरून चालकाचे नियंत्रण सुटले आणि ऑटो तब्बल 20 फूट खाईत जाऊन पलटी झाला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या दुर्घटनेत मधुकर लसवंते (65) रा. पुलगाव व ऑटोचालक भुपेश वाडगुरे (40) रा. पिसगाव हे दोघ गंभीर जखमी झाले. तर 9 वर्षाची मुलगी अदिती राऊत दीड वर्षाचा दर्शन नेहारे या चिमुकल्याला किरकोळ मार लागला. ऑटोमधील 2 महिलांना कुठलीही इजा झाली नाही.

जखमींना मारेगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. किरकोळ जखमी अदिती व दर्शन यांच्यावर उपचार करून सुट्टी देण्यात आली. मात्र गंभीर जखमी असल्यामुळे ऑटोचालक भूपेश वाटगुरे याला पुढील उपचारासाठी यवतमाळ आणि मधुकर लसवंते यांना वणी येथे हलविण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान दुपारी 5 वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती आहे.

हे देखील वाचा:

मधमाशांच्या हल्ल्यात तरुण उपसरपंचाचा मृत्यू

Comments are closed.