जितेंद्र कोठारी, वणी: कुंपणच खेत खाण्याचा प्रकार नुकताच शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत उघडकीस आला आहे. बांधकाम साईटवरील इंजिनियरच साईटवरील लोखंडी सळाख व इतर साहित्य चोरून त्याची विक्री करीत होता. या प्रकरणी 2 चोरट्यांना शिरपूर पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून 10 लाख 19 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. मात्र चोरीचा मुख्य सूत्रधार बांधकाम साइट इंजिनियर चंचलेश सर्जेराव टेम्बूलकर (27) हा फरार होण्यास यशस्वी झाला. विशेष महणजे चोरीची तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या 12 तासातच चोरट्यांना अटक व मुद्देमाल जप्त केल्याची कामगिरी शिरपूर पोलिसांनी पार पाडली. अमित नत्थू गाताडे (25) रा. कुर्ली व नीलेश जगन्नाथ कोडापे (30) रा. आबई ता. वणी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत चारगाव, शिरपूर, शिंदोला, कळमना ते चंद्रपूर जिल्हा सीमेपर्यंत रस्त्याचे बांधकाम सुरु आहे. कंत्राटदार आर. के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. ली. पुणे तर्फे पी.एम. उंबरकर वणी हे रस्त्याचे काम करीत आहे. सदर कामावरील आबई फाटा ते शिंदोला दरम्यान पुलाचे काम सुरु आहे. या बांधकाम साइटवरुन 10 mm लोखंडी सळईचे 8 बंडल किंमत 55 हजार व 40 प्रॉप जॅक किमत अंदाजे 43 हजार असे एकूण 98 हजाराचा साहित्य चोरी झाल्याची तक्रार प्रोजेक्ट मॅनेजर फिर्यादी प्रशांत प्रभाकर येरणे यांनी शनिवार 7 मे रोजी शिरपूर पोलिस ठाण्यात नोंदविली होती.
तक्रारीवरुन शिरपूर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्द तक्रार दाखल केली. गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या महितीवरुन शिरपूरचे ठाणेदार सपोनि गजानन करेवाड यांनी दोन वेगवेगळे पथक तयार करून अवघ्या 12 तासामध्ये गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून आरोपीना अटक केली.
आरोपी कडून 10 मिमी लोखंडी सळईचा 1 बंडल व गुन्ह्यात वापरण्यात आलेला जॉनडिअर कंपनीचा ट्रॉलीसह ट्रॅक्टर क्र. (MH29BP0242) असा एकूण 10 लाख 19 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर मुख्य आरोपी साइड इंजिनियर चंचलेश सर्जेराव टेम्बूलकर (27) रा. करेल, जि. छिंदवाडा मध्यप्रदेश हा तक्रार दाखल होताच फरार झाला. प्रकरणाचा तपास ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनात शिरपूर पोलीस करीत आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.