वनोजा येथील शेतक-यांना खरीप पीक कर्ज वाटप

जिल्हा मध्यवर्ती बँकेचा उपक्रम, संजय देरकर यांची प्रमुख उपस्थिती...

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तालुक्यातील वनोजा येथील शेतक-यांना शेतीच्या चालू हंगामा करीता बी-बियाणे, खत खरेदी तसेच शेतीपयोगी कामासाठी पीक कर्ज वाटप करण्यात आले. बुधवारी दिनांक 1 जून रोजी मंदिर परिसरात हा कार्यक्रम पार पडला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यां वतीने हे पीक कर्ज वाटप करण्यात आले. यावेळी शेतक-यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर यांनी शेतक-यांना मार्गदर्शन केले.

लवकरच शेतीच्या खरीप हंगामाला सुरूवात होणार आहे. बी-बियाणे, खते, शेतीउपयोगी साहित्य खरेदी करण्या करता आर्थिक सहाय्यतेची गरज असते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने दर वर्षी पीक कर्ज योजना राबवली जाते. यावर्षी देखील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने वनोजा देवी येथे कर्ज वाटप कार्यक्रम व मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शेतक-यांना पीक कर्जाचे संजय देरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वाटप करण्यात आले.

शेतक-यांनी बँकेच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा – संजय देरकर
शेतकरी बांधवानी फक्त पीक कर्जावर अवलंबुन व राहता इतरही योजनांचा लाभ घेतला पाहिजे. आपण विश्वास ठेवून मला निवडून दिले त्यामुळे तो विश्वास सार्थ करून दाखवणे माझे कर्तव्य आहे. यापुढेही शेतक-यांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी मी कटीबद्ध राहणार.
– संजय देरकर, उपाध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती स.बँ.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गोवर्धन टोंगे, डिमन टोंगे, जनार्धन गाडगे, अरुण चोपनी, प्रवीण खानझोडे, भोगेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नवनियुक्त संचालक व संचालिका, गावातीला महिला बचत गट व गावातील नागरिक उपस्थित होते.

Comments are closed.