पिंपरी येथून ट्रॅक्टर रोटाव्हेटरची चोरी

शेतकऱ्याचे सव्वा लाखांचे नुकसान 

तालुका प्रतिनिधी, वणी: खुल्या जागेवर ठेवलेले ट्रॅक्टरचे रोटाव्हेटर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना पिंपरी (कायर) येथे मंगळवारी उघडकीस आली. यात सदर शेतकऱ्याचे सव्वा लाखांचे नुकसान झाले आहे. शेतकरी प्रभाकर मुळे यांनी चोरीची तक्रार शिरपूर पोलिसांत नोंद केली असून पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.

वणी तालुक्यातील पिंपरी (कायर) येथील शेतकरी प्रभाकर मुळे यांच्या मालकीचे शक्तिमान कंपनीचे ट्रॅक्टर रोटाव्हेटर गावालगतच्या खुल्या जागेवर नेहमीप्रमाणे ठेवले होते. ट्रॅक्टरवर रोजंदारीने कामं करणाऱ्या चालकाचा पेटूर जवळ दुचाकी अपघातात मृत्यू झाला.

दरम्यान प्रभाकर मुळे दोन दिवस कामात व्यस्त होते. चोरट्यांनी नेमका याच संधीचा फायदा घेत रोटाव्हेटर लंपास केले. यात सदर शेतकऱ्याचे सव्वा लाखांचे नुकसान झाले आहे. तसेच ऐन हंगामात व्यवसाय बंद पडला. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. सदर प्रकरणाचा शिरपूर पोलीस तपास करीत आहे. 

हे देखील वाचा:

श्री लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेचे शनिवारी उद्घाटन

वनोजादेवी येथील शेतक-यांना खरीप पीक कर्ज वाटप

Comments are closed.