नगर वाचनालयात शिवराज्याभिषेक दिवस साजरा

पत्रकार सुनील पाटील यांच्या हस्ते हारार्पण

जितेंद्र कोठारी, वणी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त येथील नगर वाचनालयात शिवराज्याभिषेक दिवस साजरा करण्यात आला. जेष्ठ पत्रकार सुनील पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हारार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी नगर वाचनालयाचे संचालकवृंद व गणमान्य नागरिक उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

छत्रपती शिवाजी महाराज यांचा 6 जून 1674 या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता. या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजेच शिवस्वराज्यभिषेक दिन. हा दिवस स्वराज्याची सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस म्हणून राज्यात साजरा करण्यात येते.

Comments are closed.